Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock


प्रस्तावना
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे. मराठी भाषेची पूर्वपीठिका ही अभिजात भाषेला आवश्यक असलेल्या कालखंडापर्यंत जाऊन शोधता येऊ शकते, हे आता निश्चित झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषा...

  • Name : मध्ययुगीन मराठी गद्य आणि लीळाचरित्र एकाक
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 104 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मध्ययुगीन मराठी गद्य आणि लीळाचरित्र एकाक
- +


प्रस्तावना
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे. मराठी भाषेची पूर्वपीठिका ही अभिजात भाषेला आवश्यक असलेल्या कालखंडापर्यंत जाऊन शोधता येऊ शकते, हे आता निश्चित झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केव्हा व्यवहारात आली, याविषयीचे वाद आता संपुष्टात आलेले आहे. परंतु या मराठी साहित्याची ग्रंथ निर्मिती ही महानुभाव पंथाच्या उदयानंतर सुरु झाली हे निर्विवाद सत्य आहे. महानुभाव पंथामध्ये साहित्य निर्मिती ही फक्त भक्ती कारणे निर्माण झालेली आहे. मराठी भाषेत साहित्य निर्माण करावे आणि त्याला विशिष्ट दर्जा प्राप्त करून द्यावा असा कुठलाही हेतू हा या साहित्य निर्मितीच्या मागे नाही. मराठी भाषेतील जे साहित्य महानुभाव पंथात निर्माण झाले, ते महानुभाव पंथातील आराध्य असलेले पंचकृष्णांची ‘भक्ती’ या प्रेरणेने. हीच भक्ती प्रेरणा महानुभाव ग्रंथ निर्मितीसाठी सर्वाधिक महत्त्वाची राहिलेली आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की या पंचकृष्णांची भक्तीच हे या महानुभाव साहित्याच्या निर्मिती मागे कार्यरत होती. श्रुती आणि स्मृती या दोन भक्तीप्रकाराच्या हेतूनेच गेल्या सातशे आठशे वर्षांपासून महानुभाव साहित्यामध्ये सातत्याने ग्रंथांची निर्मिती सुरू आहे. महानुभाव साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वीपासूनच पूर्वग्रह दूषित असाच होता आणि काही अंशी तो आताही असल्याचे सहज जाणवते. 
श्रीचक्रधर स्वामींच्या ‘लीळा’ स्मरणातून सुरू झालेला हा ग्रंथ निर्मितीचा प्रवास मराठी साहित्याला मार्गदर्शक असाच ठरलेला आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये साहित्याच्या जवळपास सर्वच प्रकाराची निर्मिती झाली. खरंतर कुठल्याही भाषेमध्ये ज्या वेळेला साहित्याची निर्मिती सुरू होते, तेव्हा ते साहित्य अगदी बाल्यावस्थेत असते. मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेले महानुभाव साहित्य हे सुरुवातीपासूनच प्रगल्भ स्वरूपाचे होते. मध्ययुगीन साहित्यामध्ये निर्माण झालेले सर्व साहित्यप्रकार हे कुठल्याच अंगाने बाल्यावस्थेत असल्याचे जाणवत नाही. हीच खरी मध्ययुगीन मराठी साहित्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याच दर्जेदार साहित्याने नंतरच्या कालखंडामध्ये साहित्य निर्मितीसाठी एक पायंडा घालून दिला. मध्ययुगीन कालखंडातील साहित्य हे भक्तीच्या प्रेरणेने प्रेरित असले तरी, उत्तरार्धामध्ये मात्र ही भक्ती प्रेरणा, सामाजिक इच्छा आणि जाणीवाचे स्वरूप घेताना दिसून येते. हा बदल साहित्यामध्ये साधारणपणे 200 ते 300 वर्षांमध्ये झालेला दिसून येतो. या 200  ते 300 वर्षांच्या कालखंडामध्ये भक्ती प्रवाहातून निर्माण झालेला साहित्य प्रवाह अधिक ृंगारित होत गेला. समाजप्रबोधन, समाजाला वळण लावणे, समाजामध्ये भक्तीची गोडी निर्माण करणे हा विचारही सोबत सोबत सुरु होताच. भक्तीची प्रेरणा ही या कालखंडात कमी का असेना पण होतीच. मध्ययुगीन कालखंडाचा या प्रस्तावनेत विचार न करता त्याविषयीच्या विवेचनामध्ये या सगळ्या बाबी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर लीळाचरित्र ‘एकाक’(एकांक) हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट व्हावा यासाठी माझा अनेक वर्षापासूनचा प्रयत्न होता. एम.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये लीळाचरित्र, एकाक, मादंबेचे धवळे, नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर, सूत्रपाठ यासारख्या महानुभाव साहित्याचा परिचय झालेला होता. एकीकडे जिथे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि दुसरीकडे या मराठी साहित्याची गंगोत्री कुठे आहे? याचा शोध जर विद्यार्थ्यांना घेता आला नाही; तर अभिजात भाषेच्या दर्जाला विशेष महत्त्व राहणार नाही. 

1. मध्ययुगीन मराठी साहित्य.................................................11

2. मध्ययुगीन साहित्याची रचना आणि वैशिष्ट्ये.............................20

3. लीळाचरित्रकार म्हाइंभट..................................................26

4. लीळाचरित्रातील श्रीचक्रधर स्वामी........................................29

5. लीळाचरित्र एकाक : आशय आणि स्वरूप...............................32

6. लीळाचरित्र : एकाक.....................................................40

आधारभूत ग्रंथसूची..........................................................104

💬

Chat with us