Your cart is empty now.
भावगीत माणसाला चिरतरुण व आनंदी ठेवते. अशी भावगीते काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. आज माध्यमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. घरात मोठा टी.व्ही. आला, होमथेटर आले, अँड्रॉइड मोबाईल आला यातून माणसाचे मनोरंजन होऊ लागले पण आनंद मिळेनासा झाला. आज माणसांकडे निवांतपणा नाही. माणूस सुख शोधण्याच्या नादात सतत धावत आहे. अशा या धावपळीच्या, तणावाच्या व गुंतागुंतीच्या काळात माणसाला आनंदी ठेवणारी भावगीते आज कानावर पडत नाहीत. आजच्या जनरेशन-न पिढीला भलेही वेस्टर्न म्युझिकल गीत आणि संगीताची माहिती असेल, परदेशी गीतकार आणि संगीतकार माहिती असतील परंतु महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, मराठी मातीचा गंध असलेले गीतकार व संगीतकार आज ही बऱ्याच तरुणांना माहिती नाहीत, अशा भावमधुर भावगीतांची व गीतकारांची ओळख वाचकांना व अभ्यासकांना व्हावी, यासाठी हा लेखनप्रपंच
केला आहे.
1. मराठी भावगीत : स्वरूप व संकल्पना.....................................9
1.1 भावगीत : स्वरूप व संकल्पना
1.2 कविता आणि भावगीत यातील साधर्म्य व वैधर्म्य
1.3 कवितेचे भावगीतात रूपांतर
2. भावगीतांचे प्रकार .......................................................21
2.1 अंगाई गीत
2.1.1 गुणी बाळ असा जागसी का रे
- गोविंदाग्रज
2.1.2 कर आता गाई गाई
- शांता शेळके
2.2 मातृप्रेमविषयक गीत
2.2.1 रायगडावर माय हिरकणी
- शांताराम नांदगावकर
2.2.2 गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?
- पी. सावळाराम
2.3 लोकगीत
2.3.1 यळकोट यळकोट जय मल्हार
- शाहीर पुंडलिक फरांदे
2.3.2 काठी न घोंगडी घेऊन द्या की रं
- अप्पा कांबळी
परिशिष्ट - 1 ............................................................54
परिशिष्ट - 2 ............................................................59
संदर्भसूची ...............................................................78