Your cart is empty now.
विश्वात ‘शांती’ नावाची क्रांती घडावी यासाठी रक्ताचा थेंब न सांडता ‘अहिंसा’ नावाच ब्रम्हास्त्र गांधीजींनी साऱ्या जगाला दिले. म्हणूनच गांधीजींना विश्वशांतीचे दूत म्हणून ओळखले जाते. दया, प्रेम आणि सत्याच्या मूलमंत्राने गांधीजींनी साऱ्या जगाला अनुग्रहीत केले.
गांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य इतिहासात आपली वज्रछाप सोडली. एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वउद्धार करुन घ्यावयाचा असल्यास त्याने गांधी विचारांचे पाईक व्हाव कारण गांधी विचार नुसते राजकीय परीघापुरते मर्यादीत नूसन समाजवाद, स्त्रीवाद, रामराज्यातून ग्रामराज्य संकल्पना तसेच अंत्योदय तत्व डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या अंतिम रांगेतील अंतिम घटकाचा विचार करुन मांडलेले अर्थकारण, पर्यावरण, जात, धर्म आणि संस्कृती या साऱ्या विचारमंथनातून उदयास आलेली सर्वोदय संकल्पना एखाद्या राष्ट्रास स्वबळावर समृद्ध होण्यास पुरेशी आहे. म्हणून गांधी विचारांची आवश्यकता होती, आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही.