Your cart is empty now.
‘चळवळ’ हा शब्द विशिष्ट विचारधारेवर आधारित व कृतींशी संबंधित आहे. ही कृती परिवर्तनवादी असते. प्रस्थापित समाज व्यवस्थेने नवीन विचारधारा स्वीकारली म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारत्मक कृती परिहार्य ठरते. नव्या विचारांचे महत्व लक्षात आल्यावर ते विचार अंगिकारणारे ‘अनुयायी’ निर्माण होतात. त्या सर्वांच्या सामुहिक कृतीतून साकारते ती ‘चळवळ’! ती उद्दिष्टांवर आधारीत असते. समाजमन ती स्वीकारते व कालांतराने ती विचारधारा स्थिरावते. त्यालाच त्या कृतीशी संबंधित चळवळ उठाव हा ब्रिटीश व सावकारशाही विरोधात झाल्याचे दिसून येते. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर उद्योगधंद्यातून भांडवलदारांना मुबलक प्रमाणात नफा मिळू लागला. मात्र त्या नफ्याच्या तुलनेत कामगारांना मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि कामगार वर्ग संघटीत होवू लागला. या संघटनात्मक बदलातून कामगार चळवळीचा उदय झाला. ब्रिटीश अधिकारी व भारतीय सावकार यांनी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली व त्यातून आदिवासी पेटून ठरलेत. त्याचे पडसार आदिवासी चळवळीच्या माध्यमातून उमटले.