Your cart is empty now.
ज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवीन गोष्टी घडून आर्थिक क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रचंड उलाढाली होत आहेत. त्याचे पडसाद स्त्रियांच्या जीवनावर पडत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारणाच्या क्षेत्राने तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम स्वरूप अनेक कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय आव्हानेे स्त्रिया मोठ्या कुशलतेने पेलवत आहे. स्त्रियांची जीवनातील भूमिका तपासून बघता तिच्या जबाबदारीत वाढ होत असल्याचे दिसून येते. आधुनिकता स्वीकारतांना नितीमूल्य जोपासून स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तरोत्तर विकसित करण्याकडेही त्यांचे लक्ष वेधलेले दिसून येते.
भारतात 21 व्या शतकामधील स्त्री सावित्रीबाईच्या आसिम कृपेने शिकली, सवरली, बहरली तिला स्वतःची अशी एक स्पेस मिळाली. या विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रात तिने उतुंग भरारी घेतली आहे. फक्त ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना तिने केव्हाच मोडीत काढली आहे तर आजची स्त्री चूल, मूल सांभाळण्याबरोबर आपले करिअर तेवढ्याच प्रभावीपणे सांभाळते.