Your cart is empty now.
‘मागणी-पुरवठा फलनाचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात यात सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र, त्याचे महत्त्व व मर्यादा, उत्पादनाशी संबंधीत संकल्पना, फलन संबंध आणि बाजार यंत्रणा/अर्थव्यवस्था या घटकांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये मागणी, मागणीचा सिद्धान्त, व्यक्तिगत व बाजार मागणी वक्र, मागणीची लवचिकता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, मागणीचा पूर्व अंदाज यांचा समावेश आहे. तिसऱ्या युनिटमध्ये उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित समवृत्ती वक्र विश्लेषणाचा समावेश आहे. चौथ्या युनिटमध्ये उत्पादन फलन, एकूण, सरासरी व सीमांत उत्पादन, बदलत्या प्रमाणाचा नियम आणि प्रमाण फलाचा नियमाचा समावेश आहे. पाचव्या युनिटमध्ये उत्पादन खर्च सरासरी व सीमांत खर्च आणि खर्चवक्र, ण आणि ङ आकाराचे खर्च वक्र, अंतरगत आणि बाह्य मितव्ययता व अमितव्ययता या घटकांचा समावेश आहे. सहाव्या युनिटमध्ये पूर्णस्पर्धा, उद्योग संस्था व उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात या मुद्द्यांची सखोल आणि विस्तृत मांडणी केली आहे. सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.