Welcome to Prashant Publications

Rs. 275.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मानवी संसाधन हे कोणत्याही संस्थेचे सर्वांत महत्त्वाचे आणि गतिशील संसाधन आहे. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड, तिचा विकास, कार्यक्षमतेत वाढ, प्रेरणा, मूल्यमापन आणि संस्थेशी सुसंवाद या...

  • Name : मानव संसाधन व्यवस्थापन (Human Resource Management)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V |
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 200 Pages
  • Barcode : 9789377761127

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानव संसाधन व्यवस्थापन (Human Resource Management)
- +

मानवी संसाधन हे कोणत्याही संस्थेचे सर्वांत महत्त्वाचे आणि गतिशील संसाधन आहे. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड, तिचा विकास, कार्यक्षमतेत वाढ, प्रेरणा, मूल्यमापन आणि संस्थेशी सुसंवाद या सर्व बाबींचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक असते. आधुनिक काळातील तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, जागतिकीकरण, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलती कार्यसंस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या अपेक्षा यामुळे मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये व्यावसायिक कौशल्ये, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि रोजगारक्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. याच दृष्टिकोनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार टी.वाय.बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी ‘मानव संसाधन व्यवस्थापन’ हे पुस्तक तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
या पुस्तकामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाची संकल्पना, स्वरूप, उद्दिष्टे व महत्त्व, मानव संसाधन नियोजन, नोकरी विश्लेषण, मानव संसाधनाची भरती व निवड प्रक्रिया, प्रशिक्षण व विकास, कार्यप्रदर्शन मूल्यमापन, वेतन व मोबदला व्यवस्थापन, कर्मचारी कल्याण, औद्योगिक संबंध, कर्मचारी प्रेरणा, नेतृत्व, कामाच्या ठिकाणी बदलते वातावरण तसेच आधुनिक मानव संसाधन व्यवस्थापनातील विविध प्रवाह यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना केवळ समजून घेता याव्यात एवढेच नव्हे, तर त्या संकल्पनांचा व्यावहारिक जीवनात उपयोग करता यावा, हा या पुस्तकामागील मुख्य उद्देश आहे.
पुस्तक लेखन करताना विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेचा विशेष विचार करण्यात आला आहे. प्रत्येक घटकातील विषय शक्य तितक्या सोप्या, सुबोध आणि प्रवाही भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे, मुद्देसूद स्पष्टीकरणे, व्यावहारिक संदर्भ आणि अभ्यासासाठी उपयुक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परीक्षेच्या दृष्टीने तसेच स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक जीवनासाठीही उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

प्रकरण 1........................................................................9
मानव संसाधन व्यवस्थापन - परिचय
(Introduction to HRM)
1.1 मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ, संकल्पना आणि उद्देश.
(Meaning, Concept, and Objectives of HRM)
1.2 मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्याप्ती आणि कार्ये.
(Features, scope, and functions of HRM)
1.3 मानव संसाधन व्यवस्थापनाचे संस्थांमधील महत्त्व
(Importance of HRM in organizations)
1.4 मानव संसाधन व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापन यातील फरक.
(Difference between HRM and Personnel Management)
1.5 मानव संसाधन व्यवस्थापकाची भूमिका, गुण आणि आव्हाने
(Role, qualities, and challenges of HR Manager)

प्रकरण 2.......................................................................48
मानव संसाधन नियोजन
(Human Resource Planning)
2.1 मानव संसाधन नियोजन : अर्थ आणि संकल्पना
(Meaning and concept of Human Resource Planning (HRP))
2.2 मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक
(Factors affecting HRP)
2.3 मानव संसाधन नियोजनाची प्रक्रिया / टप्पे
(Process/steps in HRP)
2.4 मानव संसाधन आणि नियोजनाच्या मर्यादा
(Advantages and limitations of HRP)
2.5 मानव संसाधन नियोजनाचे प्रकार आणि महत्त्व
(Types and Importance of Human Resource Planning)

प्रकरण 3.......................................................................71
कार्य विश्लेषण आणि कार्य रचना
(Job Analysis and Job Design)
3.1 कार्य विश्लेषणाचा अर्थ आणि महत्त्व
(Meaning and Importance of Job Analysis)
3.2 कार्य विश्लेषणाची प्रक्रिया आणि साधने
(Process and Tools of Job Analysis)
3.3 कार्य वर्णन आणि कार्य विशिष्टता
(Job Description and Job Specification)
3.4 कार्य वर्णन लेखन
(Writing a Job Description)
3.5 कार्य रचना
(Job Design)

प्रकरण 4.....................................................................107
भरती आणि निवड
(Recruitment and Selection)
4.1 भरती - अर्थ, उद्दिष्टे आणि महत्त्व
(Meaning, objectives, and importance of Recruitment)
4.2 भरतीवर परिणाम करणारे स्रोत आणि घटक
(Sources and factors affecting Recruitment)
4.3 निवडीचा अर्थ आणि प्रक्रिया
(Selection meaning and selection procedure)
4.4 निवड धोरण आणि मूल्यमापन.
(Selection policy and evaluation of the selection process)
4.5 आधुनिक पद्धती- वॉक-इन, आउटसोर्सिंग, ई-भरती आणि ई-निवड.
(Modern methods -- Walk-in, Outsourcing, E-recruitment, and E-selection)

प्रकरण 5.....................................................................136
नियुक्ती, कार्यपरिचय आणि प्रशिक्षण
(Placement, Induction and Training)
5.1 नियुक्तीचा अर्थ आणि समस्या
(Meaning and problems of Placement)
5.2 परिचयाचे महत्त्व आणि उद्दिष्टे
(Meaning, objectives, and importance of Induction)
5.3 कर्मचारी प्रशिक्षणाचा अर्थ आणि उद्दिष्टे
(Meaning and objectives of Employee Training)
5.4 प्रशिक्षणाच्या पद्धती - कामावर आणि कामाच्या बाहेर
(Training methods -- On-the-job and Offthe-job)
5.5 प्रशिक्षणाचे प्रकार आणि ई-प्रशिक्षण
(Types of training and E-training)

प्रकरण 6.....................................................................176
मानव संसाधन व्यवस्थापनामधील अलीकडील कल
(Recent Trends in HRM)
6.1 मानवी संसाधन लेखांकन
(HR Accounting)
6.2 मानवी संसाधन लेखापरीक्षण
(HR Audit)
6.3 ग्रीन HRM
(Green HRM)
6.4 स्वेच्छानिवृत्ती योजना
(VRS)

💬

Chat with us