Your cart is empty now.
भारतीय ज्ञान परंपरा ही प्राचीन व वसाहतपूर्व काळापासून विकसित झाली असुन ती शाश्वत स्वरुपाची आहे. भारतीय ज्ञानपरंपरेने नेहमीच मानवतेला प्रोत्साहन दिले आहे. भारतातील प्राचीन काळापासूनच्या ज्ञानपरंपरेचा उद्देश्य व्यक्तीला नैतिक विवेकी व मुल्याधिष्ठीत बनविणे हा होता. तसेच समाजाच्या व व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीमधील अमर्याद सृजनात्मक शक्तीला नवी शुद्ध व मानवी दिशा देण्यावर या ऐतिहासिक ज्ञान परंपरेचा भर होता. या व्यापक उद्देश्याने प्रस्तुत पुस्तकात इतिहास पुराण व राजतंरगिणी पूर्विच्या कथा आर्काइव्हल, भिमबेटका, गृह चित्रे, अशोक शिलालेख व ऐहोळे प्रशस्ती, दशज्ञान महाकाव्य सुहनशेपा, मानसोल्लास, मधुराविजयम, कुणाल जातक कथा, तमिळ संगम साहित्य आणि राजतरंगीणी ग्रंथ, मराठी दृष्टांत पाठ, क्रिस्तपुराण व बखर उल्फी, गुल्शन इब्राहिमी यासारखे ऐतिहासिक ग्रंथाचे वैशिष्टे व महत्व ख्यात तुंगकुचुनिया बुरंजी, पुस्तकाची वैशिष्टे व महत्व तसेच काळ, अवकाश कॅलेडर, दिप संग्रहणी इत्यादीविषयी सखोल व अभ्यासपूर्ण माहितीने विश्लेषण करण्यात आले आहे.