Your cart is empty now.
‘विवाह’ आणि ‘स्वयंवर’ दोघांचा वापर वेगवेगळ्या अर्थाने होत असतो. स्वयंवर ही एक प्राचीन विवाह पध्दती आहे.
स्वयंवर म्हणजे मुलीने आपल्या पसंतीच्या पुरूषाशी विवाह करणे होय. या विवाहात मुलीच्या पालकांच्या संमतीला महत्व नाही. वयात आलेल्या मुलीचे तिच्या पित्याने योग्यवेळी लग्न केले नाही तर तीन वर्षे किंवा तीन महीने वाट पाहून मुलगी स्वतः आपला पती निवडू शकते. स्मृतिवचनानुसार याला मान्यता आहे. तसेच मातापिता नसलेल्या मुलीलाही स्वयंवराचा हक्क आहे. शिव-पार्वतीचा विवाह हा स्वयंवराचाच भाग आहे. सीतामाईचे स्वयंवर झाले; तसेच द्रौपदीचेही स्वयंवर झाले होते. प्राचीन नलदमयंती स्वयंवर प्रसिध्द आहे. रूक्मिणी स्वयंवर सर्वांना परिचीत आहेत.
वेदकाळात कन्यादानाच्या पध्दतीपेक्षा उभयपक्षी स्वयंवराची पध्दती अधिक रूढ होती. कन्येने आपल्या इच्छेनुरूप पतीची निवड करून त्याला वरणे म्हणजेच स्वयंवर होय.
भद्रा वधूर्भवती यत्सुपेशा ः
स्वयं सा मित्रं वनुते जने चित् |
(ॠ. 10/27/12)
अर्थात जी वधू भाग्यवती व लावण्यवती असते. ती समाजात स्वतः पती निवडते.
इ.स.च्या 12 व्या शतकापर्यंत स्वयंवराची प्रथा सुरू होती. पृथ्वीराज-संयोगिता यांचे स्वयंवर त्याच उदाहरण आहे.
सनपूर्व चारशे वर्षापासून ॠतृप्राप्तीपूर्वीच मुलीचे लग्न व्हावे अशी सामाजिक धारणा बनत चालली. त्यामुळे स्वयंवर पध्दतीकडे हळूहळू डोळेझाक झाली. विवाह पध्दती प्रचलीत होत गेली. त्यातही पणविवाह प्रेमविवाह, सेवाविवाह, विनिमय विवाह, विधी-विधान सुरू झालेत अष्टविध विवाहातील ब्रह्मय-विवाह सर्वश्रेष्ठ विवाहप्रकार मानला गेला. 4 | प्रशांत पब्लिकेशन्स
विवाहामध्ये वाङ्निश्चय, सीमांतपूजन, मधुपर्क, परस्पर निरीक्षण, कन्यादान, अक्षतारोपण, विवाह होम, गृहप्रवेशनीय होम, ऐरिणीदान, गृहप्रवेश आणि आशीर्वचन समारंभ-संस्कारांचा समावेश झाला आहे.
भारतीय विवाहामध्ये पुरूषापेक्षा स्त्रीचे महत्व अत्यधिक आहे. स्त्रीला स्वतःचे जीवन पुरूषाच्या जीवनाशी एकरूप करायचे असते. नदी जशी स्वतःचा रंग, रूप, आकार व स्वाद ह्या सर्वांचा त्याग करून सागरात मिसळून जाते, तशी स्त्री सुध्दा स्वतःचे व्यक्तीत्व पुरूषात एकरूप करून जगते.
परिस्थितीक संसर्गाच्या काळात विवाह समारंभाचे पावित्र्य दूरावत चालले आहे. विवाह हा संस्कार न रहाता समारंभ झालेला आहे.
विवाह संस्काराच्या प्रयत्नातील खारीचा वाटा म्हणूनच हे लेखन.