Your cart is empty now.
.‘व्यापार व वाहतूक भूगोल’ या पुस्तकांचे लेखन करतांना पहिल्या प्रकरणात व्यापारी भूगोलाची ओळख करून देतांना अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, व्यापारावर परिणाम करणारे घटक त्यामध्ये प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, रीकार्डीयनचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिध्दांत आणि व्यापाराचे प्रकार या घटकांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात वाहतूक भूगोलाची ओळख करून देताना अर्थ, व्याख्या आणि वाहतुकीचे महत्त्व, वाहतुकीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करताना प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वाहतुकीचे प्रकार त्यात भू-वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि पाईपलाईन वाहतूक तसेच विकासामध्ये वाहतुकीचे योगदान इत्यादी घटकांविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पध्दतीने विषयाची मांडणी व त्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.