Your cart is empty now.
व्यवहारिक कौशल्ये विकास (Soft Skills Development) हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या तृतिय वर्ष वर्गाच्या पुर्नरचित अभ्यासक्रम नुसार लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देतांना आनंद होत आहे. सदर पुस्तकात व्यवहारी कौशल्ये विकास याची तोंड ओळख, वेळ व्यवस्थापन कौशल्ये, ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्ये, समस्या निवारण आणि निर्णय निश्चितीकरण कौशल्ये, समूहकार्य व समूह बांधणी कौशल्ये आणि अध्ययन कौशल्ये संबंधी घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या परंतु प्रभावीभाषेत केलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्यासारख्या चोखंदळ शिक्षक व विद्यार्थीवर्गाच्या अपेक्षा व इच्छा पूर्ण करेल असा आत्मविश्वास मनाशी बाळगून आहोत. हा ग्रंथ लिहितांना अनेक इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथ, वेबसाईट, शोधनिबंध यांचा उपयोग झालेला आहे.