Welcome to Prashant Publications

Rs. 495.00 10% OFF
Availability: 10 left in stock

शैक्षणिक मानसशास्त्र हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड् पदवीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच डी.टी.एड्, एम.एड्, एम.एस्.डब्ल्यू. (चडथ), मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकल्याण विभाग, बी.एड् पूर्व परीक्षा अभियोग्यता चाचणी (ढअढ), सर्व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

शैक्षणिक मानसशास्त्र
- +

शैक्षणिक मानसशास्त्र हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड् पदवीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच डी.टी.एड्, एम.एड्, एम.एस्.डब्ल्यू. (चडथ), मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकल्याण विभाग, बी.एड् पूर्व परीक्षा अभियोग्यता चाचणी (ढअढ), सर्व विषयाच्या सेट आणि नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी तसेच हा विषय अध्यापन करणाऱ्या सर्व क्षेत्रातील शिक्षकांना व अभ्यासकांना या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.
शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचा उपयोग अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचे लेखन करताना मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पद्धती, तत्त्वे यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावयाचा याचे उपयोजन अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालकांच्या विकास अवस्था व त्यावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद निर्माण होण्याची कारणे-उपाय, अध्यापनाची परिणामकारकता, विशेष शिक्षण घेणारी मुले, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, सृजनशीलता, विचार, कल्पना, संकल्पना व समस्या निराकरण, ज्ञानरचनावाद, संकल्पना चित्रण व मनोचित्रण याचा प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनात वापर, मेंदू आधारित अध्ययन, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या व डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, ताण व्यवस्थापन, अध्ययनार्थीची विविधता, राजकीय सामाजिक व सांस्कृतिक मितींचे बालकावर होणारे परिणाम आणि त्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवन जगत असताना होणारा उपयोग अत्यंत मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

शैक्षणिक मानसशास्त्राची ओळख : 1.1 शास्त्र, 1.2 मानसशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि शाखा, 1.3 शैक्षणिक मानसशास्त्र – अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये, व्याप्ती व मर्यादा, 1.4 मानवी वर्तनाच्या अभ्यास पद्धती – अ) आत्मनिरीक्षण पद्धती ब) प्रायोगिक पद्धती क) निरीक्षण पद्धती ड) जीवनवृत्तांत पद्धती, 1.5 मानसशास्त्राचा शिक्षकाला होणारा उपयोग, 1.6 अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने शैक्षणिक मानसशास्त्राचे उपयोजन.
अध्ययनार्थीची वाढ आणि विकास : 2.1 अनुवंश – स्वरूप आणि महत्त्व, 2.2 जैविक अनुवंश – अनुवंशाचे नियम व अनुवंशाचे शैक्षणिक महत्त्व, 2.3 परिस्थितीचे स्वरूप व महत्त्व – परिस्थितीचे प्रकार-अंतरिक व बाह्य परिस्थिती, 2.4 सामाजिक अनुवंश – सामाजिक अनुवंशाचे व्यक्ती विकासातील असलेले महत्त्व, 2.5 वाढ व विकासाच्या पायर्‍या (बाल्यावस्था ते कुमारावस्था) – वाढ आणि विकास-संकल्पना, स्वरूप व व्याख्या, वाढ व विकास यातील फरक, विकास प्रक्रियेची तत्त्वे, वाढ व विकासावस्था-जन्मपूर्व, जन्मोत्तर अवस्था, शैक्षणिक उपयोजन व महत्त्व, 2.6 अध्ययनकर्त्याच्या वाढ आणि विकासात शाळेची भूमिका.
व्यक्तिभेदाशी शालेय संपादनाचा असणारा संबंध : 3.1 व्यक्तिभिन्नता/व्यक्तिभेद – व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप, व्याप्ती व कारणे, 3.2 व्यक्तिभेद, 3.3 मानसिक स्वास्थ्य व ताण व्यवस्थापन – व्याख्या, संकल्पना, मानसिक आरोग्य संपन्न असलेल्या व्यक्तीची लक्षणे, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे, 3.4 समायाजेन आणि विसमायोजन – समायोजनाचा अर्थ, व्याख्या, समायोजनाची प्रक्रिया व सुसमायोजित व्यक्तिची लक्षणे विसमायोजनाची व्याख्या, लक्षणे, विसमायोजनाची कारणे व संरक्षण यंत्रणा, 3.5 अध्ययनार्थ्यांचे उत्तम मानसिक आरोग्य राखण्यात शाळेची भूमिका/उपायोजना, 3.6 विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीचे उपाय, 3.7 कुटूंबाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम व उपाययोजना, 3.8 मानसिक आरोग्य उपचार आणि प्रतिबंध, 3.9 ताण व्यवस्थापन – संकल्पना, स्वरूप, अर्थ, व्याख्या, ताणाची उगमस्थाने/कारणे, शारीरिक ताणाचे परिणाम व मानसिक ताणाचे परिणाम, ताणाचे संभाव्य परिणाम, 3.10 ताणाचे व्यवस्थापन – संकल्पना, ताण व्यवस्थापन तंत्रे, साधक वर्तन व अन्य तंत्रे.
समावेशितांचे मानसशास्त्र : 4.1 विशेष शिक्षण – अर्थ, स्वरूप व व्याख्या, 4.2 विशेष गरजा असणार्‍या मुलांची ओळख – विशेष गरजा असणार्‍या बालकांचे प्रकार – अंधविद्यार्थी, कर्णबधिर विद्यार्थी, मतिमंद विद्यार्थी, अस्थिव्यंग विद्यार्थी, अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी, प्रज्ञावान विद्यार्थी, सृजनात्मक विद्यार्थी, बालगुन्हेगार विद्यार्थी, समस्यात्मक विद्यार्थी, मागास विद्यार्थी, 4.3 वंचितांचे शिक्षण – वंचित म्हणजे काय? शिक्षणातील वंचित घटक – अ) सामाजिकदृष्ट्या वंचित-मुक्त, विमुक्त, भटक्या जमाती, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, शहरी व ग्रामीण झोपडपट्टीतील वंचित, अल्पसंख्यांक, देवदासी व वारांगणांची मुले. ब) शारीरिकदृष्ट्या वंचित – मूकबधिर, अंध व अस्थिव्यंग क) मानसिकदृष्ट्या वंचित-बौद्धिकदृष्ट्या सामाजिक दबाव व मानसिक न्यूनगंड असणार्‍या व्यक्ती, 4.4 विशेष शिक्षणाची गरज, 4.5 मनोरंजनातून विशेष शिक्षणाची गरज, 4.6 शिक्षणाच्या एकत्रिकरणाची संकल्पना – समावेशितांचे शिक्षण, 4.7 सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत विशेष बालकांसाठी कार्यक्रम, 4.8 समायोजन व विसमायोजनाची कारणे, गैरवर्तन करणारी मुले व शोषित मुले शैक्षणिक कार्यक्रम/उपाययोजना.
शाळेतील शिक्षकाची भूमिका : 5.1 शाळेतील शिक्षकाच्या विविध भूमिका, 5.2 आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापन पद्धतीवर होणारा परिणाम, 5.3 शिक्षकाची परिणामकारकता – व्याख्या व क्षेत्रे, 5.4 अध्यापन-व्याख्या व अध्यापनशास्त्र की कला, 5.5 अध्यापन विषयक विविध उपपत्ती – व्याख्या, अध्यापन उपपत्तीची आवश्यकता व वर्गीकरण, 5.6 परिणामकारक अध्यापनाची वैशिष्ट्ये, 5.7 शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रियासंप्रेषणाची व्याख्या, वैशिष्ट्ये, संवाद प्रक्रिया व प्रकार, आंतरक्रिया प्रभावी करण्यासाठी शिक्षकाची भूमिका, 5.8 शिक्षकाचे वर्तन आणि वर्गसंपादन – शिक्षकाचे आदर्श वर्तन, शिक्षक वर्तन व्याख्या, शिक्षक वर्तनाची वैशिष्ट्ये, आदर्श शिक्षकवर्तनाची पाच क्षेत्रे, 5.9 अध्यापन उपपत्ती – शिक्षक वर्तन, उपपत्ती, शिक्षकवर्तन व उपपत्तीमधील गृहितके, 5.10 शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, 5.11 शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यांसंबंधी संशोधने – अध्यापकांचे प्रकार, अध्यापक वर्तनाचे प्रकार, 5.12 शिक्षकांचे वर्गातील अध्यापन वर्तन आणि तंत्रे – अ) फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली, ब) शाब्दिक आंतरक्रिया वर्गप्रणाली, 5.13 अनुकूल शालेय वातावरणाची निर्मिती आणि संघटन – अ) शाळेतील अध्ययन विषयक सुविधा. ब) शाळेतील भौतिक सुविधा.
अध्ययन : 6.1 अध्ययन – अर्थ, व्याख्या, स्वरूप, अध्ययनाची वैशिष्ट्ये, 6.2 अध्ययनाचे मापन आणि अध्ययन वक्र – अध्ययन मापनाचे घटक, अध्ययन वक्र-व्याख्या प्रकार, अध्ययन वक्राचे टप्पे, पठरावास्था-कारणे व शैक्षणिक महत्त्व, अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व, परिणामकारक अध्ययनासाठी आवश्यक अटी, 6.3 अध्ययनाच्या उपपत्ती व त्याचे शिक्षणातील महत्त्व – अध्ययन उपपत्तीची गरज, व्याख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण, 6.4 अध्ययनाच्या विविध उपपत्ती/सिद्धांत, 6.5 वर्तनवाद व बोधात्मकवाद – स्वरूप व शैक्षणिक उपयोजन, 6.6 अध्ययन संक्रमण संकल्पना व प्रकार – अर्थ, प्रकार, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती, अध्ययन संक्रमणाचे घटक, अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व, 6.7 अध्ययनावर परिणाम करणारे घटक – आंतरिक घटक व बाह्य घटक.
उच्च मानसिक प्रकिया : 7.1 संवेदना – व्याख्या, वर्गीकरण, अवबोध समष्टीवादाची भूमिका-बाह्य घटक व अंतरिक घटक आणि शैक्षणिक महत्त्व, 7.2 कल्पना – व्याख्या, प्रकार, कल्पनेचे जीवनातील महत्त्व, कल्पनेचे साहचर्य, साहचर्याचे नियम व कल्पनेचे शैक्षणिक महत्त्व, 7.3 संकल्पना/संबोध निर्मिती संकल्पना – संकल्पना निर्मिती, टप्पे/पायार्‍या, संकल्पनेचे प्रकार व संकल्पनेचे शैक्षणिक महत्त्व, 7.4 विचार प्रक्रिया – प्रकार व साधने/तंत्रे-विचार प्रक्रिया – विचार म्हणजे काय? अर्थ, व्याख्या घटक, स्तर, प्रकार विचार प्रक्रियेची साधने/प्रतिके व विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व.
वर्गातील शिक्षण आणि विद्यार्थी विविधता : 8.1 अध्ययन शैलीतील विविधता – अर्थ, संकल्पना, व्याख्या व प्रकार, 8.2 (अ) कोल्ब यांनी विकसित केलेली अध्ययनशैली शोधिका (ब) हनी. पी. आणि मुमफोर्ड ए. (1992) अध्ययन शैलीचे प्रकार, 8.3 प्रभावी अध्ययनासाठी शैक्षणिक उपयोजन, 8.4 बहुसांस्कृतिवादातील विविधता – अ) अर्थ, संकल्पना व घटक. ब) बहुसांस्कृतिवादामुळे अध्ययनार्थ्यांमध्ये निर्माण होणारे भेद/फरक. क) बहुसांस्कृतिक वर्गातील शिक्षकाची भूमिका. ड) शिक्षकांची भूमिका. इ) बहुसांस्कृतिक समाजासाठीच्या शिक्षणासंदर्भात शैक्षणिक संस्थांची भूमिका.
बाल्यावस्था व विकसन अवस्थेचे राजकिय, सामाजिक व सांस्कृतिक पैलू : 9.1 बाल्यावस्था व विकासासंदर्भात राजकिय बाजू, अर्थ व उपयोजन – अ) लोकशाही, हुकूमशाही, जमातवाद व समाजवाद. ब) बालक, स्त्रिया, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय व्यक्तींच्या शिक्षणासाठी भारत सरकारच्या योजना आणि त्यांचे विकासातील योगदान, 9.2 बाल्यावस्था व विकसन अवस्थेचे सामाजिक पैलू, अर्थ व उपयोजन – अ) सामाजिक मिती/पैलू – कुटूंब, शेजारी, मित्र आणि समाज. ब) बाल्यावस्था व विकासावस्थेतील सामाजिक मितींचे उपयोजन, 9.3 बाल्यावस्था व विकासातील सांस्कृतिक मितींचा अर्थ आणि उपयोजन – अ) सामाजिक मूल्ये, रूढी, परंपरा व सांस्कृतिक संस्था. ब) बाल्यावस्था व विकासातील सांस्कृतिक बाजूचे उपयोजन, 9.4 बाल्यावस्था व विकसनावरील प्रसारमाध्यमांचा परिणाम – अ) प्रसारमाध्यमांचे प्रकार – लिखित प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व सामाजिक प्रसारमाध्यमे. ब) बाल्यावस्था विकसनावर होणारे प्रसारमाध्यमांचे उपयोजन.
अध्ययनातील सक्रिय सहभाग व मेंदू आधारित अध्ययन : 10.1 अ‍ॅलन पॅव्हिओचा द्वि-संकेतन सिद्धांत व शैक्षणिक उपयोजन, 10.2 ज्ञानरचनावादाची उपपत्ती – ज्ञानरचनावाद अर्थ व वैशिष्ट्ये, 10.3 ज्ञानरचनावादाचे अध्यपनातील उपयोजन, 10.4 बोधनिक ज्ञानरचनावाद – संकल्पना, घटक, प्रक्रिया, बोधात्मक विकासाच्या अवस्था व बोधात्मक ज्ञानरचनावादाचे उपयोजन, 10.5 सामाजिक ज्ञानरचनावाद – संकल्पना, पातळ्या/स्तर व सामाजिक ज्ञानरचनावादाचे उपयोजन, 10.6 संकल्पना चित्रण व मनोचित्रण – अ) संकल्पना चित्रण – संकल्पना, फायदे, संकल्पना चित्र कसे तयार करावे, शिक्षणातील संकल्पना चित्रे, शिक्षणासाठी संकल्पना चित्रण व संकल्पना चित्रणाचे शैक्षणिक उपयोजन. ब) मनोचित्रण – व्याख्या, दृश्यरचना, वैशिष्ट्ये, घटक, 10.7 मेंदू आधारित अध्ययन – अ) मेंदू रचना, कार्य व मज्जासंस्था. ब) उजवा मेंदू व डावा मेंदू गोलार्ध-कार्ये, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या किंवा डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, 10.8 मेंदू आधारित अध्ययनाचे शैक्षणिक उपयोजन.
अध्यापनाचे आयाम (पैलू) : 11.1 अध्यापनाची संकल्पना – व्याख्या, स्वरूप, लक्षणे, वैशिष्ट्ये, अध्यापनाचे स्तर, 11.2 वर्गअध्यापनातील विविधता – व्याख्यान पद्धती, प्रकल्प पद्धती, परिसंवाद व प्लिप्ड क्लास रुम, 11.3 अध्यापनशास्त्र आणि प्रौढअध्यापन – अ) अध्यापनशास्त्र – संकल्पना, बालकांसाठी आशयाधिष्ठित अध्यापनशास्त्र, ब) प्रौढ अध्यापन-अध्यापनशास्त्र व प्रौढ शिक्षण फरक, 11.4 सूक्ष्म अध्यापन आणि अध्यापन कौशल्ये – 21 व्या शतकातील अध्यापन कौशल्ये. सूक्ष्म अध्यापन – व्याख्या, तत्त्वे, वैशिष्ट्ये, चक्र, फायदे आणि तोटे, अध्यापन कौशल्ये, 11.5 नैदानिक कसोट्या आणि उपचारात्मक अध्यापन – अ) नैदानिक कसोट्या – व्याख्या, गरज व महत्त्व, वैशिष्ट्ये, अध्यापनात नैदानिक कसोट्यांचे उपयोजन. ब) उपचारात्मक अध्यापन – व्याख्या, गरज व महत्त्व, टप्पे व सूत्रे, 11.6 वार्षिक नियोजन व घटक नियोजनाची गरज व महत्त्व – अ) वार्षिक नियोजन – अर्थ, गरज, वार्षिक नियोजन आराखडा व महत्त्व. ब) घटक नियोजन – अर्थ, गरज अंगे व महत्त्व.
प्रभावी अध्यापन : 12.1 अध्यापनाची सूत्रे, 12.2 अध्ययन व अध्यापनाची तत्त्वे, 12.3 अध्यापनाची प्रतिमाने – संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये (पदबंध) व मुलभूत घटक, 12.4 अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण – 1) ज्ञान प्रक्रियाकरण/माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने 2) व्यक्तिगत विकास प्रतिमाने 3) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने 4) वर्तन-परिवर्तन/वर्तनप्रणाली प्रतिमाने, 12.5 अध्यापनाची प्रतिमाने – 1) अग्रत संघटक प्रतिमान 2) संकल्पना प्राप्ती प्रतिमान 3) पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, 4) न्यायतत्त्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान, 12.6 सांघिक अध्यापन – संकल्पना व व्याख्या, प्रकार आणि अध्यापनातील उपयोजन, 12.7 अध्यापन हा एक व्यवसाय – संकल्पना, अध्यापन व्यवसायाचे समज-अपसमज (गैरसमज) व अध्यापन व्यवसायाची वैशिष्ट्ये.

💬

Chat with us