Welcome to Prashant Publications

Rs. 410.00
Availability: 10 left in stock

संप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास
- +

संप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.
यादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.