Welcome to Prashant Publications

Rs. 675.00
Availability: 10 left in stock

संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते,...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संशोधन पद्धती
- +

संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.