Welcome to Prashant Publications

Rs. 190.00 10% OFF
Availability: 0 left in stock

युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्री पीएच.डी. परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर पहिला या करिता विद्यापीठामार्फत सुधारित नवीन अभ्यासक्रम सन 2021 पासून लागू केलेला आहे. त्या अभ्यासक्रमात संशोधन...

  • Name : संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Research
  • Barcode : 9789390862252

Click here to be notified by email when this product becomes available.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे

युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्री पीएच.डी. परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर पहिला या करिता विद्यापीठामार्फत सुधारित नवीन अभ्यासक्रम सन 2021 पासून लागू केलेला आहे. त्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धती आणि संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे या दोन भागाचा समावेश आहे. सदर पुस्तक आम्ही पेपर पहिला याकरिता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावे असे तयार करण्याचा एक प्रयत्न केला आहे. पुस्तकात संशोधनातील गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या संकल्पना सोप्या व सहज भाषेत मांडण्यात आल्या आहेत. तसेच नवीन संकल्पना विषयी थोडक्यात अर्थपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमनिहाय व मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशय घटकावर दिशादर्शक काही मुद्दे सदर पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत ते आपल्या परीक्षा तसेच पुढील संशोधन विषयक वाटचालीत
उपयोगाचे ठरतील यात शंका नाही. संशोधन हा विषय व्यापक असून त्यावर जेवढे वाचन कराल तेवढे थोडे आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून संशोधनविषयक संशोधन नीतितत्त्वे या भागातील नवीन वाटणाऱ्या संकल्पना आणि संबोध सोप्या व सहज भाषेत लिहिलेले आहेत जेणे करून सर्वांना त्या समजतील. काही ठिकाणी केवळ मुद्दे तर आवश्यक त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. संशोधन हा विषय तसे पहाता खूप व्यापक आहे. संपूर्ण संशोधनाचा संपूर्ण अभ्यास हा या छोट्याश्या पुस्तकातून पूर्ण करणे शक्य नसले तरीही परिक्षेस उपयुक्त घटक व त्यावर आधारित संकल्पना समजण्याकरिता हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. पुस्तकात लेखन करताना थोडक्यात व उपयुक्त असे केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील संकल्पना आणि नीतितत्त्वे लक्षात आणून देऊन त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नपेढी तयार करून दिली आहे.               

विभाग पहिला : संशोधन पद्धती

1. संशोधनाची मूलतत्वे आणि संशोधनाचे प्रकार...........................11
संशोधनाची उद्दिष्टे
वैज्ञानिक संशोधन
संशोधन पद्धतीचे महत्त्व
चांगले संशोधन सराव
संशोधनाचे प्रकार आणि पद्धती : सर्वेक्षण, व्यष्टि
अध्ययन, प्रायोगिक, क्षेत्रिय अध्ययन

2. संशोधन साहित्याचा आढावा............................................19
मूलभूत संकल्पना आणि गरज
साहित्याचा शोध
संशोधन साहित्याचे प्रकार
संशोधनाचा आढावा
स्त्रोत
विश्लेषण प्रक्रिया
आढाव्याचे नियोजन आणि दस्तऐवज

3. संशोधन आराखडा.......................................................24
समस्येची ओळख आणि सुसूत्रीकरण, प्रकिया
परिकल्पना (कूेीिंहशीळी)
संशोधनाची साधने

4. माहितीचे विश्लेषण आणि अर्थनिवर्चन..................................31
संपादन
साकेतांक
प्रतिलेखन
तालिकाकरण/सारणीकरण/कोष्टकीकरण
संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरची ओळख उदा. एसपीएसएस, मिनीटॅब,
मॅटलॅब
माहितीचे सादरीकरण (आलेखाद्वारे)

5. संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि अहवाल लेखन.........................37
केद्रिय प्रवृत्तीची परिमाणे
विवरण आणि सहसंबंध
विचलनशिलता
प्रतिपगमन आणि सहसंबंध विश्लेषण
परिकल्पना परिक्षण आणि चाचणीची सार्थकता
संशोधन पेपर आणि अहवाल लेखन

विभाग दुसरा : संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे
6. संशोधनाची नीतितत्त्वे आणि वैज्ञानिक संहिता...........................44
संशोधनाची तात्विक ओळख आणि संशोधन नीतितत्त्वांची संकल्पना
विज्ञान आणि संसोधनाचे नैतिक दृष्टिकोन
बौद्धीक प्रामाणिकता
संसोधनाची एकात्मता
शास्त्रीय गैरवर्तन : खोटेपणा, बनावटपणा वाङ्मय चौर्य
प्रकाशनातील अनावश्यकपणा
संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे

7. प्रकाशन विषयक नीतितत्त्वे..............................................50
प्रकाशनविषयक नीतितत्त्वांची संकल्पना आणि महत्त्व मार्गदर्शक नियमावली: कोपे, वामे इत्यादी
प्रकाशन विषयक गैरप्रकार : संकल्पना, समस्या आणि प्रकार
प्रकाशन विषयक नीतितत्त्वांचे उल्लंघन, लेखन आणि योगदान
विषयक
प्रकाशनविषयक गैरव्यवहाराची ओळखणे, तक्रार आणि अपिल
करणे.

8. लुटारू आणि मुक्त स्वरूपाची प्रकाशने..................................55
लुटारू प्रकाशक आणि मासिके
खुला ॲक्सेस चळवळ आणि प्रकाशने
कॉपीराईट तपासण्यासाठी शेरपा आणि रोमियो
(ठेचएज) साधने आणि जर्नल शोधक (फाइंडर)/जर्नल शोधासाठीची साधने, डगड इत्यादी
प्रकाशन विषयक गैरव्यवहारावर गटचर्चा

9. गुणवत्तेचे निकष आणि व्यवहार.........................................60
कॉपीराईट आणि बौद्धीक मालमत्ता हक्क
वाडमय चौर्य तपासणी : सॉफ्टेवेअर संसाधने जसे टर्नइन, उरकूड
डेटाबेस (इंडेक्स आणि सायटेशन) आणि संशोधन मेट्रिक्स : एच
इंडेक्स, जी इंडेक्स, आय 10 इंडेक्स, प्रभाव गुणांक, एसएनआयपी,
एसजेआर, आयपीपी, साईट्सकोर

प्रश्नसूची क्र. 1 ते 7...........................................................69

संदर्भ ग्रंथसूची.................................................................60

💬

Chat with us