Welcome to Prashant Publications

Rs. 220.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘समकालीन राजकीय विचारप्रणाली’ हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकाची रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्ष कला वर्गाच्या DSE या राज्यशास्त्र विषयाच्या...

  • Name : समकालीन राजकीय विचारप्रणाली
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : July 2026
  • Total Pages : 154 Pages
  • Barcode : 9789377760496

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समकालीन राजकीय विचारप्रणाली
- +

‘समकालीन राजकीय विचारप्रणाली’ हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकाची रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्ष कला वर्गाच्या DSE या राज्यशास्त्र विषयाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमाचा आणि महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत शिकविला जाणारा आधुनिक राजकीय विचारप्रणाली हा विषय, तसेच नेट/सेट, MPSC आणि UPSC अभ्यासक्रमांचा विचार केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत आणि स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात येईल. 
या पुस्तकात ‘समकालीन राजकीय विचारप्रणाली’ या विषयाशी निगडित सर्व प्रमुख विचारप्रणालीचा आढावा घेतलेला आहे. पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात विचारप्रणालींशी निगडित संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्ताची मांडणी केलेली आहे. दुसऱ्या प्रकरणात उदारमतवाद आणि लोकशाही समाजवाद या विचारप्रणालीचा अर्थ स्वरूप, प्रकार आणि मूल्यमापनाची चर्चा केलेली आहे. तिसऱ्या प्रकरणात मार्क्सवाद आणि मूलगामी विचारसरणी नव-मार्क्सवादाशी संबंधित विविध सिद्धांत आणि मर्यादांचे विश्लेषण केलेले आहे. शेवटच्या अंतिम व चौथ्या प्रकरणात डिजिटल स्वातंत्र्यवाद, तांत्रिक आशावाद, नव-राष्ट्रवाद, पर्यावरणवाद आणि बहुसंस्कृतीवाद या आधुनिक काळातील विचारप्रणालीशी संबंधित विविध मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. जागतिक राजकारणात विचारप्रणालीची प्रासंगिकता बद्दल देखील परामर्श घेतलेला दिसून येतो. पुस्तकात समाविष्ट संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे आणि विद्यार्थ्यांना आकलन व्हावे म्हणून उदाहरणांचादेखील समावेश केलेला आहे. 
प्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थी वर्गास समकालीन राजकीय विचारप्रणाली समजण्यास हातभार लागेल, तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना आधुनिक राजकीय विचारप्रणाली आणि राजकीय सिद्धान्त या विषयांवर तज्ज्ञांनी लिहिलेल्या संदर्भग्रंथांचा आधार घेतलेला आहे. 

1. राजकीय विचारप्रणाली...................................................7
अर्थ, व्याख्या, आणि स्वरूप
राजकीय विचारप्रणाली उगमस्थाने किंवा स्त्रोत
राजकीय विचारप्रणाली वैशिष्ट्ये आणि कार्य
राजकीय विचारप्रणाली साधने
विचारप्रणाली अंत संकल्पना
राजकीय विचारप्रणाली महत्त्व

2. उदारमतवाद आणि लोकशाही समाजवाद ...............................38
अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि उदारमतवादाची वैशिष्ट्ये
उदारमतवादाचे प्रकार
उदारमतवादाचे मूल्यमापन
लोकशाही समाजवाद अर्थ, स्वरूप आणि तत्वे
लोकशाही समाजवाद प्रकार आणि मूल्यमापन

3. मार्क्सवाद आणि नव- मार्क्सवाद.....................................101
मार्क्सवाद-द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवाद
वर्ग संघर्ष आणि अतिरिक्त मूल्य सिद्धांत
मार्क्सवाद मूल्यमापन
नव मार्क्सवाद-अर्थ स्वरूप आणि विकास
नव मार्क्सवाद मर्यादा

4. समकालीन विचारसरणी...............................................136
डिजिटल उदारमतवाद, तांत्रिक आशावाद
नव-राष्ट्रवाद
पर्यावरणवाद-अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये
बहुसंस्कृतीवाद आणि ओळखीचे राजकारण
जागतिक राजकारणात विचारप्रणालीची प्रासंगिकता

संदर्भ ग्रंथसूची...............................................................153

💬

Chat with us