Welcome to Prashant Publications

Rs. 295.00
Availability: 10 left in stock

साहित्यकृती ही विशिष्ट वाङ्मयप्रकारांतर्गत आविष्कृत होत असली तरी तिची म्हणून काहीएक स्वायत्तता असते. म्हणूनच अनेक अंगाने तिचे विश्लेषण संभवते. अनेकानेक समीक्षा पध्दतीने साहित्यकृतीची मीमांसा शक्य आहे तथापि साहित्यकृतीचा आशय हा...

  • Name : समकालीन साहित्य मीमांसा
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 28
  • Barcode : 9789394403390

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समकालीन साहित्य मीमांसा
- +

साहित्यकृती ही विशिष्ट वाङ्मयप्रकारांतर्गत आविष्कृत होत असली तरी तिची म्हणून काहीएक स्वायत्तता असते. म्हणूनच अनेक अंगाने तिचे विश्लेषण संभवते. अनेकानेक समीक्षा पध्दतीने साहित्यकृतीची मीमांसा शक्य आहे तथापि साहित्यकृतीचा आशय हा चिकित्सेचा गाभा आणि दिशा सूचित करतो. मीमांसकाने साहित्यकृतीच्या अंतरंगातील हे सत्व ओळखले की साहित्यकृतीचे वाङ्मयीन मूल्य आणि सौंदर्य उलगडता येते.
डॉ. वासुदेव वले यांनी विविध वाङ्मयप्रकारातील लक्षवेधी साहित्यकृतींचा असाच सामर्थ्यशाली आढावा या ग्रंथात घेतला आहे. प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्याची ही ‘समकालीन साहित्य मीमांसा’ सर्जनशील तर आहेच पण आस्वादाच्या रसरशीतपणाचा प्रत्यय देणारीही आहे. डॉ. वासुदेव वले यांनी या समीक्षाग्रंथातून आपला वेगळा मीमांसक दृष्टिकोन अभ्यासकांसमोर ठेवला आहे. तो लक्षणीय आणि म्हणून महत्त्वाचा आहे.

– प्रा. डॉ. मनोहर जाधव
मराठी विभाग प्रमुख/अधिष्ठाता मानव्य विद्या/
प्रमुख- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

Samkalin Sahitya Mimansa