Your cart is empty now.
समाजशाास्त्राच्या उदयाला अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील युरोपमधील सामाजिक, बौध्दिक वातावरण जसे कारणीभूत ठरले तसेच 18 व्या शतकातील औद्यागिक क्रांती आणि पाठोपाठ झालेली फे्रंच राज्यक्रांतीही महत्वाची ठरली. समाजात मुख्यतः युरोपमध्ये त्यामुळे फार मोठे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आले. समाजाच्या पुनर्निर्मितीचा, नव-बांधीणीचा प्रश्न निर्माण झाला. विस्कळीत होऊ घातलेल्या समाजाला व्यवस्थित रुप देणे गरजेचे झाले. यातुनच समाजशास्त्राचा उदय झाला.
समाजशास्त्र हे एक आधुनिक शास्त्र आहे. समाजशास्त्राच्या वस्तुनिष्ठ अध्ययनाला 19 व्या शतकात सुरवात झाली. समाजशास्त्र हे मानवाच्या सर्वसामान्य सामाजिक जीवनाचा अभ्यास करते. मानवी सामाजिक वर्तनाबाबतचे नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो मानवी समाजाच्या आरंभिक टप्यापासून समाजाचे अध्ययन सुरु आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मानवाने समाज निर्माण केला. समाजाला कायम टिकवण्यासाठी मानवाने मूल्ये निर्माण केलीत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, परिवर्तने घडून आली. मानवाचे आचार-विचार काळानुसार बदलले. परंतु सामाजिकता मात्र टिकून राहीली.
सदरील पुस्तकात समाजशास्त्राचा इतिहास, समाजशास्त्रीय संकल्पना, सामाजिक नियंत्रण आणि परिवर्तन, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक संस्था, राज्य आणि समाजव्यवस्थेची आव्हाने या घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.