Welcome to Prashant Publications

Rs. 250.00
Availability: 10 left in stock

कोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना
- +

कोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक संबंधांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा पाया घातला गेला. समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. 1924 साली डॉ. गोविंद घुर्ये यांनी भारतातील आदिवासी समुदाय, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतीय रुढी, प्रथा व परंपरांचे सामाजिक कार्य अशा विविध विषयांवर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणार्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर पुस्तकात विविध मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.