Welcome to Prashant Publications

Rs. 135.00
Availability: 10 left in stock

नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सामान्य नकाशाशास्त्र
- +

नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे ज्ञान अगोदर तो चिन्हे, संकेत, रेखाचित्रे व चित्रांचा उपयोग करीत असे. त्यामुळे नकाशाशास्त्र ही कला खूपच प्राचीन आहे हे स्पष्ट आहे.

जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करतांना मानव हा नकाशांचा वापर खूप पूर्वी पासून करीत आला आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक लेण्या, प्राचीन स्थळे, शहरे, गावे यांचे निरीक्षण केले असता यात चिन्हे व रेखाचित्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. यावरून आपल्याला कल्पना येते की, प्राचीन काळातील लोकांनी नकाशाशास्त्रांची रचना केली, त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर करून नकाशाशास्त्राचा विकासही केला. आधुनिक काळात मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा विकास होत गेला व तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की, सामान्य माणूस ही नकाशाशास्त्राचा वापर करू लागला आहे. हवाई छायाचित्र, दूरसंवेदन, उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली व स्थान निश्चिती प्रणाली, संगणक, मोबाईल, टेलिव्हीजन यावर नकाशाशास्त्राचा वापर मानव केल्याशिवाय रहात नाही.