Your cart is empty now.
मराठी भाषा आणि साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करताना पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना साहित्यशास्त्र व समीक्षा या दोन विषयांचा सविस्तर अभ्यास असणे गरजेचे ठरते. कारण त्यातूनच त्याला साहित्य कसे निर्माण होते? साहित्य का लिहिले, वाचले जाते? याचे ज्ञान होऊ शकते. प्राचीन काळापासून भारतात आणि इतर देशातही लेखक आपले लेखन का करतो? आणि वाचक त्यांनी लिहिलेले का वाचतो? लेखकाला लेखनाचा विषय कसा सुचतो? त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था काय असते? याबरोबरच वाचक त्या साहित्य वाचनाकडे का वळतो? वाचकाला त्यातून नेमके काय अनुभवायला मिळते? एखादी साहित्यिकृती वाचल्यावर त्याची मनोवस्था नेमकी कशी असते? अशा अनेक प्रश्नांभोवती चर्चा होताना दिसते आणि त्याचीच उत्तरे त्याला साहित्यविचाराच्या अभ्यासातून प्राप्त होतात.
तर साहित्यनिर्मितीनंतर त्याला साहित्याचे आकलन, आस्वाद, मूल्यमापन, अर्थनिर्णयन कसे करावे? एखाद्या साहित्यिकृतीकडे कसे पाहावे? याची समतोल दृष्टी समीक्षेच्या अभ्यासातून प्राप्त होते. साहित्यकृतीचे मर्म उकलून दाखविण्यासाठी समीक्षा कशी उपयोगी असते, हे विद्यार्थ्याला किंवा अभ्यासकाला समजते.तसेच समीक्षा ही लेखक आणि वाचक या दोहोंच्या दृष्टीने कशी आवश्यक आहे याची देखील कल्पना येण्यास साहित्य समीक्षेचा अभ्यास असणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी पासून महाविद्यालयीन स्तरावरती नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले.च्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण व्हावी तो कौशल्यधिष्टीत बनवा यावरती भर देण्यात आलेला आहे आणि अशा या त्याअनुषंगाने सर्व वर्गांचे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. अशा या अभ्यासक्रमातसुद्धा द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘साहित्यविचार आणि समीक्षा' या विषयाचा समावेश होणे हे या विषयाचे महत्त्व अधोरेखित करते आहे. म्हणूनच या विद्यार्थ्याला साहित्यशास्त्र आणि समीक्षा याचे पूर्णपणे आकलन व्हावे, ते त्याला सहजपणे समजावे, आकलन व्हावे व त्याने ते कौशल्य आत्मसात करावे अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे. तसेच अतिशय सोप्या व सुलभ पद्धतीने सर्व घटकांचे विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आशा आहे की हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या पसंतीस पडेल.