Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

साहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या...

  • Name : साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य) Sahityavichar (Bhartiya Aani Pachhatya)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA (DSE-2) À
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789388769730

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य) Sahityavichar (Bhartiya Aani Pachhatya)
- +

साहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.

घटक 1 : साहित्याचे स्वरूप /13
1.1 साहित्य : संज्ञा आणि संकल्पना
1.2 साहित्याची लक्षणे आणि व्याख्या
1.2.1 भारतीय संस्कृत पंडितांनी दिलेली काव्य लक्षणे
1.2.2 पाश्चात्याची साहित्यविषयक मते
1.3 मराठीतील साहित्यविचार व कलात्मक सौंदर्य
1.4 साहित्य कलाविष्कारांचा अनुकृती सिद्धांत
1.4.1 प्लेटोचा अनुकृती सिद्धांत
1.4.2 ॲरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत
घटक 2 : साहित्याची प्रयोजने /51
2.1 साहित्याचे प्रयोजन स्वरूप व व्याप्ती
2.2 संस्कृत साहित्यमीमांसक मम्मट यांची सहा प्रयोजने
2.3 पाश्चात्यांची प्रयोजने
2.4 मराठी साहित्यिकांची प्रयोजने
2.5 कलावादी व जीवनवादी भूमिकेतून साहित्य प्रयोजने
घटक 3 : साहित्यनिर्मितीची कारणे /74
3.1 साहित्य निर्मिती : एक अलौकिक घटना
3.2 साहित्य निर्मितीचे प्रधान कारण : प्रतिभा शक्ती
3.2.1 प्रतिभाशक्तीचे संस्कृत साहित्यकारांनी केलेले वर्णन
3.2.2 प्रतिभाशक्तीचे प्रकार व कार्य
3.3 साहित्यनिर्मितीची इतर गौण कारणे
3.4 साहित्यनिर्मितीत स्फुर्ती आणि कल्पनाशक्तीचे कार्य
3.5 समारोप
घटक 4 : साहित्याची भाषा /95
4.1 साहित्याची भाषा : स्वरूप व कार्य
4.2 साहित्याच्या भाषेचे घटक
4.2.1 शब्दशक्ती : स्वरूप व प्रकार (अभिधा-लक्षणा-व्यंजना) 4.2.2 अलंकार विचार
4.2.3 वक्रोक्ती विचार
4.3 साहित्यभाषेचे पूरक घटक
4.3.1 रूपक, प्रतिमा, प्रतीक, प्राक्कथा
4.3.2 सूचकता, विश्वात्मकता
4.3.3 भावनात्मकता-वैचारिकता आणि सेंद्रियत्व
4.4 शैली विचार : संकल्पना व प्रकार
घटक 5 : साहित्यातील रस /141
5.1 भारतीय साहित्यातील ‌‘रसविचार‌’
5.2 भरतमूनीचे रससूत्र
5.3 रसविचार व आधुनिक मानसशास्त्र
5.4 भरताच्या रससूत्राचे चार टीकाकार
5.4.1 भट्टोलोल्लटाचा उत्पत्तिवाद
5.4.2 श्रीशंकुकाचा अनुमितीवाद
5.4.3 भट्टनायकाचा भोगवाद
5.4.4 अभिनवगुप्ताचा ‌‘अभिव्यक्तिवाद‌’
5.5 रससिद्धांत व नवसाहित्य
5.6 रससंख्येचा विचार व रसविघ्ने
5.7 समारोप
घटक 6 : साहित्य : आनंद आणि आस्वाद /177
6.1 साहित्यास्वादाची संकल्पना
6.2 साहित्यातून मिळणारा काव्यानंद
6.1.1 कवीचा निर्मितीचा आनंद
6.1.2 रसिकाचा आस्वादाचा आनंद
6.3 साहित्याची अभिरुची
6.4 पाश्चिमात्यांनी ‌‘साहित्यानंद‌’ संदर्भात मांडलेले सिद्धांत
6.4.1 ॲरिस्टॉटलच्या ‌‘कॅथार्सिस‌’ सिद्धांत
6.4.2 रिचर्डसचा ‌‘प्रेरणासंतुलनाचा सिद्धांत‌’
6.5 समारोप