Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

या पुस्तकाची मांडणी अभ्यासक्रमाभिमुख तसेच परीक्षा-केंद्रित ठेवण्यात आली असून संकल्पनांची मांडणी मुद्देसूद, शास्त्रीय आणि संदर्भासहित करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी इंग्रजी तांत्रिक संज्ञांचा (ढशलहपळलरश्र ढशीाळपेश्रेसू) वापर करून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सुदूर संवेदन (Remote Sensing)
- +

या पुस्तकाची मांडणी अभ्यासक्रमाभिमुख तसेच परीक्षा-केंद्रित ठेवण्यात आली असून संकल्पनांची मांडणी मुद्देसूद, शास्त्रीय आणि संदर्भासहित करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी इंग्रजी तांत्रिक संज्ञांचा (ढशलहपळलरश्र ढशीाळपेश्रेसू) वापर करून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना विषयाचे आंतरराष्ट्रीय शास्त्रीय स्वरूप समजावे, याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सरावासाठी विविध प्रकारचे मुबलक सराव प्रश्न दिलेले आहेत.

प्रकरण 1........................................................................7
सुदूर संवेदनाची ओळख
(Introduction to Remote Sensing)
अ) सुदूर संवेदनाची व्याख्या, संकल्पना आणि इतिहास
इ) सुदूर संवेदन प्रक्रिया
उ) सुदूर संवेदनाचा वापर
प्रकरण 2.......................................................................29
सुदूर संवेदनाची मुलतत्वे
(Basic Principles of Remote Sensing)
अ) ऊर्जेचे स्त्रोत आणि उत्सर्जन तत्वे
इ) विद्युतचुंबकीय वर्णपटलाची संकल्पना
उ) विद्युतचुंबकीय उत्सर्जनाच्या वातावरणातील आंतरक्रीया
ऊ) विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचे भूपृष्ठावरील घटकांशी होणाऱ्या आंतरक्रिया
प्रकरण 3.......................................................................53
प्रतिमा अर्थनिर्वचन आणि विश्लेषण
(Interpretation and Analysis)
अ) सुदूर संवेदनामध्ये संकेतांचे प्रेषण, ग्रहण आणि प्रक्रिया
इ) प्रतिमा अर्थनिर्वचन आणि विश्लेषण
उ) दृश्य प्रतिमा अर्थनिर्वचन
ऊ) अंकीय प्रतिमा अर्थनिर्वचन प्रकरण 4.......................................................................86
सुदूर संवेदनाचे प्रकार
(Types of Remote Sensing)
अ) प्रस्तावना
इ) सुदूर संवेदनाचे प्रकार
उ) दूरसंवेदित प्रतिमांची वैशिष्ट्ये
प्रकरण 5.....................................................................107
सुदूर संवेदनाची ओळख आणि सुदूर संवेदन स्थानके
(Introduction to Remote Sensing and Platforms)
अ) सुदूर संवेदन तंत्र : व्याख्या, अर्थ आणि संकल्पना
इ) उपग्रहांचे प्रकार
उ) क्रमवीक्षण प्रणाली
ऊ) संवेदकांचे प्रमुख प्रकार
प्रकरण 6.....................................................................125
हवाई छायाचित्रण
(Aerial Photography and Sensors)
अ) हवाई छायाचित्रणाची ओळख
इ) हवाई छायाचित्राची भूमिती
उ) हवाई छायाचित्रांचे प्रकार
ऊ) त्रिमितीय दृश्यासाठी हवाई छायाचित्रांच्या जोडीचे सुसूत्रीकरण
ए) हवाई छायाचित्राचे प्रमाण व सीमांत माहिती
संदर्भ ग्रंथसूची...............................................................142