Your cart is empty now.
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे “मेरी इक्यावन कविताएं” हे राष्ट्रीय काव्यविचार व्यक्त करणारे काव्यसंग्रहाचे मराठी अनुवाद करताना अत्यंत मनस्वी आनंद आणि राष्ट्रभक्तिपर अभिमानाची भावना मनात दाटून येते.
अटलजींच्या लेखणीने सतत तेवत ठेवलेला राष्ट्रीय जागृतीचा स्फुल्लिंग, त्यांच्या कवितांमधून प्रकटलेला राष्ट्रनिष्ठ विचार आणि तत्त्वज्ञान हे आपल्यासाठी एक अनमोल वैचारिक वारसा आहे. हा अमूल्य राष्ट्रीय ठेवा मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय भाषांमधून अधिक व्यापक स्तरावर प्रचारित करण्यासाठी जे जे सहकार्य लाभले त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
या कार्यामागे प्रेरणा ठरलेले देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या राष्ट्रसमर्पित विचारसरणीने आणि कवितांमधील विचारमूल्यांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या आस्थेने या अनुवाद कार्यास वैचारिक पाठबळ मिळाले हेच या उपक्रमाचे खरे प्रेरणास्थान ठरले आहे.
जागतिक काव्यविश्वामध्ये भारतीय संस्कृती, विचारधारा आणि तत्त्वज्ञान यांचा मेरुदंड असलेल्या या काव्यांचा मराठी अनुवाद हा पुढील पिढ्यांपर्यंत राष्ट्रीय वैचारिक वारसा संक्रमित करण्याचा एक विनम्र प्रयत्न आहे.
देश, राष्ट्रधर्म आणि साहित्यविचारावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना हा अनुवादित काव्यग्रंथ ‘या पुन्हा दीप उजळूया...!’ अशा मर्मस्पर्शी शीर्षकासह सादर करीत आहे.