Welcome to Prashant Publications

Rs. 325.00
Availability: 10 left in stock

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप...

  • Name : अर्थशास्त्राचा परिचय ( Introduction to economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA |Sem - I & II |
  • Manufacturing : 2026 / 02 / 10
  • Barcode : 9788197627378

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अर्थशास्त्राचा परिचय ( Introduction to economics)
- +

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.
हे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.
आपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही.

1. अर्थशास्त्राचा परिचय....................................................13
(Introduction to Economic Science)
1.1 अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ - संपत्ती, कल्याण, दुर्मिळता आणि आधुनिक
1.2 अर्थशास्त्राचे स्वरूप
अ) सूक्ष्म किंवा व्यष्टी अर्थशास्त्र स्थुल किंवा समष्टी
ब) यथार्थ किंवा वस्तुनिष्ठ आणि आदर्शनिष्ठ अर्थशास्त्राचे स्वरूप
क) अर्थशास्त्र कला आणि विज्ञान या स्वरूपात
ड) अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे
1.3 अर्थशास्त्राची व्याप्ती
1.4 आर्थिक नियम (Economics Law) - अर्थ, वैशिष्ट्ये आणि मर्यादा
2. उपभोक्त्याच्या वर्तुणूकीचा परिचय.....................................34
(Introduction of Consumers Behaviors)
2.1 मानवी गरज
2.1.1. अर्थ आणि वैशिष्ट्ये
2.1.2. गरजांचे वर्गीकरण
2.1.3. उपभोग आणि उपयोगिता संकल्पना
2.2 आऱ्हासी सीमांत उपयोगिता
2.3 मागणी
2.3.1 अर्थ आणि व्याख्या
2.3.2 मागणीचा सिद्धांत
2.3.3 मागणी ठरविणारे घटक
2.3.4 मागणीची वृद्धी आणि ऱ्हास
2.4 मागणीची लवचिकता : अर्थ
3. उत्पादनाचे सिद्धांत.......................................................59
(Theory of Production)
3.1 मूलभूत संकल्पना : संयंत्र, उत्पादन संस्था, उद्योग, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्विजनाधिकार
3.2 उत्पादन फलनाचा अर्थ (Meaning of Production Function)
3.3 उत्पादन घटकांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये
3.4 उत्पादन खर्च
3.5 पुरवठा : अर्थ, नियम
3.6 पुरवठा ठरविणारे घटक
4. बाजाराच्या संरचनेचा परिचय............................................83
(Introduction of Market Structure)
4.1 बाजाराच्या व्याख्या
4.2 बाजाराची रचना व स्पर्धेनुसार वर्गीकरण
4.2.1 पूर्ण स्पर्धेचा बाजार
4.2.2 मक्तेदारी बाजार किंवा अपूर्ण स्पर्धा
4.2.3 मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार
4.2.4 अल्पजनाधिकार/अल्पविक्रेताधिकार बाजार
4.2.5 द्विजनाधिकार/द्विविक्रेताधिकार बाजार
4.3 अ) पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती
ब) मागणी आणि पुरवठा समतोल
5. पैसा आणि बँकायांचा परिचय........................................106
(Introduction of Money and Banking)
5.1 विनिमय पद्धती
5.1.1 विनिमय पद्धत प्रकार
5.1.2 वस्तू विनिमय किंवा प्रत्यक्ष विनिमय पद्धतीतील अडचणी
5.2 पैसा : अर्थ
5.2.1 पैशाची उत्क्रांती
5.2.2 पैशाची व्याख्या
5.2.3 पैशाची कार्ये
5.3 बँकींग
5.3.1 बँकेची उत्क्रांती
5.3.2 व्याख्या आणि अर्थ
5.3.3 बँकांची कार्ये
5.4 मध्यवर्ती बँक
5.4.1 व्याख्या आणि अर्थ
5.4.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये
5.4.3 बँकींग क्षेत्रातील नवतंत्रज्ञान
5.5 बँकींग व्यवहारात नवतंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी
6. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिचय.......................................162
(Introduction of International Trade)
6.1 आंतरराष्ट्रीय व्यापार
अ) अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य-भेद
ब) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे
क) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांत (ॲडम स्मिथ)
ड) मुक्त किंवा खुला व्यापार विरुद्ध संरक्षण
6.2 व्यवहारतोल किंवा शोधनशेष
6.3 विनीमय दर : अर्थ आणि प्रकार
7. सार्वजनिक आय-व्ययाचा परिचय....................................193
(Introduction of Public Finance)
7.1 सार्वजनिक आय-व्यय
अ) अर्थ, व्याख्या आणि सार्वजनिक आय-व्ययाचे महत्त्व
7.2 सार्वजनिक उत्पन्न : अर्थ, कर आणि करेतर उत्पन्न, करांचे वर्गीकरण आणि अर्थव्यवस्थेत करांची भूमिका
7.3 सार्वजनिक खर्च : अर्थ, भूमिका, तत्त्वे, वर्गीकरण आणि सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे
7.4 सार्वजनिक कर्ज : अर्थ, उद्दिष्ट्ये, प्रकार, महत्त्व
7.5 अंदाजपत्रक : अर्थ, प्रकार, तुटीचे अंदाजपत्रक
8. आर्थिक विकास, वृद्धी आणि नियोजन यांचा परिचय.................238
(Introduction of Economic Development, Growth and Planning)
8.1 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी
अ) अर्थ (चशरपळपस)
ब) आर्थिक विकासाचे निर्देशक
8.2 अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्या
8.3 गरिबीचे किंवा दारिद्रयाचे दुष्टचक्र
8.4 आर्थिक नियोजन
अ) अर्थ, व्याख्या, उद्दिष्ट्ये, प्रकार आणि आवश्यकता
8.5 नीती आयोग
अ) नीती आयोगाची रचना
ब) नियोजन मंडळ आणि निती आयोग यांच्यातील फरक
क) नीती आयोगाची भूमिका
ड) नीती आयोगाचे महत्त्व
संदर्भ ग्रंथसूची...............................................................257