Welcome to Prashant Publications

Rs. 450.00
Availability: 10 left in stock

  • INDEX

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय संबंध 2014 पासूनचे भारतीय परराष्ट्रीय धोरण
- +
  • INDEX

अलीकडच्या काळात म्हणजेच 20 व्या शतकात आंतरराष्ट्रीय संबंध हा महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून उदयास आलेला आहे. दळणवळणातील क्रांतीकारक बदलांमुळे जगाच्या विविध भागातील राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे; तसेच या बदलांमुळे राष्ट्रांतर्गत वेगवेगळे संबंध वाढीस लागले आहेत. त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे; वेगवेगळ्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या स्वरूपात बदल घडून आलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात व्यापक बनलेले आहे. आज मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे तसेच दळणवळणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे राष्ट्राराष्ट्रातील अंतर कमी होऊन ती एकमेकांच्या अगदी जवळ आली आहेत. तसेच अलीकडच्या प्रत्येक राष्ट्रांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच मानवाने विनाशक स्वरूपाची शस्त्रास्त्रे निर्माण केल्यामुळे जागतिक परिस्थिती तणावाची बनून ती संरक्षणासाठी व इतर गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर अवलंबून राहू लागली. त्याच वेळी दुसरीकडे अशा तणावाच्या परिस्थितीमधून जगाला बाहेर काढण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निर्मितीवर भर देण्यात आला. यातून आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूपाच्या कक्षा रूंदावलेल्या आपणास दिसून येतात.