-
मानसशास्त्रीय चाचणी (Psychological Testing)
1 x Rs. 247.50
Your cart is empty now.
Your cart is empty now.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने New Education Policy - 2020 (Revised from 2026-27) अंतर्गत पदवीस्तरासाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यानुसार बी.ए. तृतीय वर्ष, सत्र-5, मेजर पेपर-8 (आधुनिक जगाचा इतिहास: इ.स. 1780 ते इ.स. 1920) या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रस्तुत पाठ्यपुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.
सदर पुस्तकाचे लिखाण विद्यापीठाच्या अभ्यासक्रम चौकटीत राहून आणि विद्यार्थी हिताला प्राधन्य देऊन केले आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतिहास विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. नेट, सेट परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये या कालखंडावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जात असेल, त्यांनाही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य वाचकांनाही यातून समृद्ध ऐतिहासिक माहिती मिळून वाचनाचे समाधान लाभेल, अशी खात्री वाटते.
या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, केवळ क्रमिक अभ्यासक्रमापुरते (1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते राष्ट्रसंघाची स्थापना, रचना, कार्य व अपयश) मर्यादित न राहता प्रत्येक युनिटमधील मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण देताना, आवश्यक त्या ठिकाणी सखोल संशोधनात्मक व अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मुद्दा अथवा संकल्पना अतिशय विस्तृतपणे स्पष्ट करतानाच संपूर्ण कालखंडातील ऐतिहासिक सुसंगती कोठेही तुटणार नाही, याची विशेष काळजी घेतली आहे. पुस्तकाची भाषा वाचनीय, सोपी व सुबोध ठेवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सराव स्वाध्यायासाठी महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्नसंच समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुलभ होईल.