Your cart is empty now.
पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.