Welcome to Prashant Publications

Rs. 280.00 10% OFF
Availability: 10 left in stock


‘आधुनिक भारतातील वृत्तपत्र आणि शैक्षणिक धोरणाचा इतिहास’ हा प्रस्तुत ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत पॅटर्न 2020 (CBCS - Credit Based Choice System) नुसार तृतीय वर्ष कला...

  • Name : आधुनिक भारतातील वृत्तपत्र आणि शिक्षणाचा इतिहास (History of Indian Press and History of Modern Education)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - 5 & 6
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 200 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक भारतातील वृत्तपत्र आणि शिक्षणाचा इतिहास (History of Indian Press and History of Modern Education)
- +


‘आधुनिक भारतातील वृत्तपत्र आणि शैक्षणिक धोरणाचा इतिहास’ हा प्रस्तुत ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत पॅटर्न 2020 (CBCS - Credit Based Choice System) नुसार तृतीय वर्ष कला (DSE) शाखेच्या इतिहास विषयाचा बदलत्या अभ्यासक्रमानुसार लेखन केलेले आहे.
सदर ग्रंथात एकूण दोन भागात लेखन केलेले आहे. त्यामध्ये एकूण सात प्रकरणात विवरण केलेले आहे. भारतीयांची वैचारिक जडणघडण शिक्षणाने केली. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी त्या विचारांना व्यासपीठ मिळवून दिले. आधुनिक भारताच्या राजकीय जागृतीमध्ये वृत्तपत्रांचा वाटा अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या भागात वृत्तपत्र विषय अत्यंत संघर्षमय आणि रोमांचक इतिहासाचे विश्लेषण करतो. तर प्रस्तुत ग्रंथातील दुसरा भाग वसाहतकालीन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील शैक्षणिक धोरणाचा इतिहास समाविष्ट आहे.
शिक्षणाचा इतिहास हा केवळ शाळा आणि महाविद्यालये स्थापन होण्याचा इतिहास नाही, तर तो समाजाच्या बौद्धिक उत्क्रांतीचा आणि राज्यकर्त्यांच्या छुप्या अजेंडाचा इतिहास आहे. भारतात छपाई यंत्रांचे पोर्तुगीजांनी केलेले आगमन जेम्स ऑगस्टस हिक्कीने भारतात वृत्तपत्रांना केलेला प्रारंभ, त्यातून ब्रिटिश अधिकारी धोरणांवर झालेली टीका. पुढे राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर या भारतीय समाज सुधारकांनी आणि नेत्यांनी वृत्तपत्राचे महत्त्व ओळखले. वृत्तपत्रातून निर्माण होणाऱ्या जनमताची ब्रिटिशांना प्रचंड धास्ती होती. त्यामुळे भारतातील मुद्रण स्वातंत्र्य हे सतत कायद्याच्या कचाट्यात अडकलेले होते. या ग्रंथात ब्रिटिशकालीन वृत्तपत्र कायद्याचे (Press Acts) अतिशय सूक्ष्म विश्लेषण प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या भागात केलेले आहे.
ज्या - ज्या वेळी भारतीय शिक्षण व्यवस्था किंवा वृत्तपत्रांनी ब्रिटिशांच्या वर्चस्वाला धोका निर्माण केला त्या - त्या वेळी ब्रिटिशांनी कायदेशीर दडपशाहीचा मार्ग अवलंबला. कर्झनचा विद्यापीठ कायदा 1904 आणि लिटनचा व्हर्नाक्यूलर प्रेस ऍक्ट 1878 हे दोन्ही कायदे एकाच वसाहतवादी नाण्याच्या दोन बाजू आहेत. विद्यापीठांमधील तरुणांना नियंत्रणात ठेवणे आणि वृत्तपत्रांमधून व्यक्त होणाऱ्या जनमतांचा गळा घोटाने ही एका भयभयीत झालेल्या साम्राज्यवादी सत्तेचे लक्षणे होती. भारतातील शिक्षण समाजातील उच्च आणि विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते. तर ब्रिटिशांनी सर्व जाती-धर्म व वर्ग (स्तर) यांच्यासाठी शिक्षणाची द्वारे खुली केलीत. 1813 च्या संधी कायद्याने भारतीय शिक्षणाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केली. मेकॉलेच्या झिरपत्या सिद्धांताने कारकुन वर्ग तयार करून भारतीय पारंपारिक ज्ञानाला दुय्यम ठरवले. तर वुडच्या खलित्याने (इंग्रजी शिक्षणाचा मॅग्नाकार्टा) भारतात विद्यापीठाची स्थापना करून त्यातून भारतातील पहिल्या पिढीतील आधुनिक विचारवंतांना आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. हंटर कमिशनच्या शिफारशीनुसार भारतात अनेक खाजगी भारतीय संस्थांनी महाविद्यालये आणि शाळा काढण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकात राष्ट्रीय शिक्षण चळवळीला जन्म दिला. ‘सार्जंट योजना’ भारताच्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर तयार करण्यात आलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज होता. स्वातंत्र्योत्तर भारतात विविध शैक्षणिक धोरणातून वसाहतवादी मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर पडून भारताला जागतिक ज्ञानाच्या प्रवाहात आणले. त्या अनुषंगाने महात्मा फुलेंचे कार्य, राधाकृष्णन - कोठारी आयोग ते नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी घटक प्रस्तुत ग्रंथात असून त्याद्वारे भारताच्या स्व - शोधाचा हा प्रवास स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

विभाग पहिला
भारतीय पत्रकारितेचा इतिहास
History of Indian Press
प्रकरण 1. वृत्तपत्राचा उदय व विकास........................................13
1.1. प्रस्तावना / पार्श्वभूमी
1.2. मुद्रणालय : शोध आणि विकास
1.2.1. भारतात मुद्रानालयाचा उदय - विकास
1.3. वृत्तपत्राचा उदय आणि विकास
1.3.1. बेंगॉल गॅजेट
1.4. वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा - 1799
1.5. लॉर्ड हेस्टिंग्जचे उदारमतवादी धोरण (सन 1813-23)
1.6. लॉर्ड अँडम्सचे प्रतिगामी धोरण
1.7. चार्ल्स मेटकाफचे वृत्तपत्र मुक्ती धोरण
1.8. ख्रिस्ती धर्म प्रसारकांचे वृत्तपत्रातील योगदान

प्रकरण 2. ब्रिटिशकालीन भारतातील वृत्तपत्र धोरण-कायदे..................29
2.1. 1857 चा परवाना कायदा (परवाना पत्र नियम)
2.2. 1867 चा वृत्तपत्र नोंदणी कायदा (पंजीकरण कायदा)
2.3. 1878 चा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा
2.4. लॉर्ड रिपनचे वृत्तपत्रविषयक उदारमतवादी धोरण
2.5. 1908 चा वृत्तपत्र विषयक कायदा
2.6. 1910 चा वृत्रपत्र कायदा (इंडियन प्रेस अँक्ट)
2.7. 1931 चा भारतीय वृत्तपत्र कायदा
2.8. 1947 वृत्तपत्र चौकशी समिती
2.9. 1951 चा वृत्तपत्र (अक्षेपार्ह मजकूर) कायदा

प्रकरण 3. वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान...............................44
3.1. राजा राममोहन रॉय यांचे वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान
3.2. लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान
3.3. बाळशास्त्री जांभेकरांचे वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान
3.4. महात्मा गांधींचे वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान
3.5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्रातील योगदान
3.6. भारतीय भाषेतील वृत्तपत्र - (देशी भाषिक) वृत्तपत्राचा इतिहास
3.7. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वृत्तपत्रांचे योगदान
3.8. वसाहतकालीन भारतातील प्रमुख वृत्तपत्रे
3.8.1. अमृत बाजार पत्रिका
3.8.2. द बॉम्बे क्रॉनिकल
3.8.3. द हिंदू
3.8.4. प्रभाकर
3.8.5. दीनबंधू
3.8.6. काळ
3.8.7. अलहिलाल

विभाग दुसरा
आधुनिक शिक्षणाचा इतिहास
History of Modern Education
प्रकरण 4. भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास................................98
4.1. प्रस्तावना
4.2. भारतातील पारंपरिक शिक्षण पद्धती (आश्रम/गुरुकुल पद्धती)
वैदिक काळ, बौद्धिक काळ, मध्ययुगीन काळ
4.3. ख्रिश्चन मिशनरींचे शैक्षणिक योगदान (कार्य)
4.4. वारेन हेस्टिंग आणि विल्यम जोन्स यांचे शैक्षणिक योगदान
4.5. 1813 चा सनदी कायदा
4.6. इंग्रज व पौर्वात्य मतभेद / विचार

प्रकरण 5. ब्रिटिश कंपनीचे शैक्षणिक धोरण ................................119 5.1. लॉर्ड मॅकॉलेचा शिक्षणाचा खलिता (1835)
5.2. पाझर / झिरपणे सिद्धांत
5.3. सर चार्लस वुडचा खलिता (अहवाल) 1854
5.4. विद्यापीठाची स्थापना
5.5. हंटर कमिशन आयोग (1882-83)
5.6. आधुनिक भारताच्या शैक्षणिक विकासात राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीराव फुले आणि राजर्षी शाहू महाराजांचे योगदान.
5.7. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद घोष यांचे शैक्षणिक तत्वज्ञान

प्रकरण 6. विसाव्या शतकातील शैक्षणिक परिस्थिती .......................148 6.1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे शैक्षणिक विचार
6.2. 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा
6.3. सॅडलर कमिशन (आयोग) (1917-1919)
6.4. सार्जंट योजना (1944)
6.5. सँडलर आयोग (1917) आणि सार्जंट आयोग (1944) धोरणांचे तुलनात्मक विश्लेषण
6.6. पाश्चात्य शिक्षणाचा भारतीय जीवनावरील प्रभाव
6.7. डॉ. बी. आर. आंबेडकरांचे शैक्षणिक योगदान

प्रकरण 7. स्वातंत्र्योत्तर भारतातील शैक्षणिक परिस्थिती .....................175 7.1. भारतीय संविधान आणि शिक्षणाचा अधिकार हक्क
7.2. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) 1953
7.3. कोठारी आयोग (1946-66)
7.4. राष्ट्रिय शैक्षणिक धोरण (1968)
7.5. भारतीय उच्च शिक्षणातील संस्थात्मक स्थित्यंतर आणि धोरणात्मक उत्क्रांती: (RUSA) (PM-USHA)
7.6. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP-2020)

संदर्भ ग्रंथसूची ..............................................................199

💬

Chat with us