Welcome to Prashant Publications

Rs. 450.00
Availability: 10 left in stock

भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- +

भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.