Your cart is empty now.
शैक्षणिक क्षेत्र हे सतत बदलत्या जगाशी जुळवून घेणारे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उदय, शिक्षण पद्धतीतील क्रांतिकारक बदल, आणि विषयांची विस्तारलेली व्याप्ती लक्षात घेता, अभ्यासक्रमाचे सतत नूतनीकरण ही काळाची गरज ठरली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या एम.कॉम. द्वितीय वर्षासाठी आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात सुधारणा केली आहे.
विद्यार्थ्यांना या नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगत ठरेल अशा उपयुक्त शैक्षणिक साधनांची गरज लक्षात घेता, मी "आयात निर्यात व्यवस्थापन" हे नवीन पाठ्यपुस्तक सादर करत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्व-अभ्यास करता यावा यासाठी सुलभ आणि समजण्यास सोपी रचना ठेवून तयार करण्यात आले आहे. यामध्ये संभाव्य परीक्षेच्या प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे, जो विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.