Your cart is empty now.
भरडधान्य आणि आरोग्य, भरडधान्याचा इतिहास, भरडधान्याची वैशिष्ट्ये, त्याचे गुणधर्म, संकल्पना, परिचय याचा अंतर्भाव करण्यात आलेला असून बाजरी भारतीय संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष, मूल्यवर्धित
बाजरी उत्पादनाच्या पद्धती, मिलिंग, बफिंग, बेकिंग, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारी धोरण, बाजरीचे आरोग्यविषयक फायदे, पर्यावरणीय फायदे, आयुर्वेदिक दृष्टिकोन, बाजरीचे महत्त्व तसेच आहारातील महत्त्वपूर्ण तृणधान्य, नाचणी, कोडो, राळ, वरई, बार्टी, कुटकी, मोरबत्ती, राजगिरा, कांगणी बकविट, चीना इत्यादी भरडधान्याचे अध्ययन यात अंतर्भूत आहे. तसेच प्रस्तुत पुस्तिका ही नामशेष झालेल्या रानभाज्यांच्या संकल्पना, परिचय, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची गरज, त्यांच्या संवर्धनाची गरज, रानभाज्यांचे आरोग्यास फायदे, त्यांचे महत्त्व व त्याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी प्रदर्शनी व महोत्सवाला महत्व देण्यास प्रोत्साहित करणारा उपक्रम तसेच रानभाज्या संबंधित आर्थिक फायदे, रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व, औषधी वनस्पतीचे विविध प्रकार, तुळस, पानफुटी, कडुलिंब, ज्येष्ठमध, ब्राह्मी, कोरफड, दुर्वा व त्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यास फायदे इत्यादी समग्र स्वरूपातील अध्ययन या पुस्तिकेमध्ये सविस्तररित्या मांडण्यात आलेले आहे. ही पुस्तिका विद्यार्थिनीला, गृहिणींना, प्राध्यापकांना अध्ययनाकरिता उपयुक्त असून दैनंदिन जीवनामध्ये आहार घेत असताना समतोल कसा साधावा यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.