Your cart is empty now.
विल ड्युरंटच्या मते, इतिहासाला बिलगुण संस्कृतिनामक गोष्ट सहज अबोलपणे कार्यरत असते. मानवी संस्कृति हा एक जिवंत, चैतन्यमय झुळझुळता प्रवाह असतो. त्याला किनारे आहेत. माणसे आपआपसात लढतात. लुटमार करतात. एकमेकांचे प्राण घेतात. माणसांच्या रक्ताने संस्कृतिचा वाहता प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या साऱ्यांची इमानेइतबारे नोंद करतो पण त्याचवेळी याच प्रवाहाचा दोन्ही तिरांवर शांतपणे कोणाच्या ध्यानातही येणार नाही अशा रितीने माणसे परस्परांवर प्रेम करतात, स्त्री-पुरुष विवाहबद्ध होतात, अपत्यांना जन्म देवून त्यांचे संगोपण करतात, गाणी गातात, सुंदर चित्रे काढतात, शिल्पे खोदतात आणि कविता लिहितात, मानवी इतिहास म्हणजे खरोखर संस्कृतिच्या दोन्ही तिरांवर जे घडत असते त्याला ‘इतिहास’ म्हणतात.