Your cart is empty now.
‘कृषी-आधारित उद्योग’ हा विषय दोन- (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर साठी हा विषय कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (डएउ) म्हणून पदवी स्तरावर निश्चित करण्यात आला आहे. ‘कृषी आधारित उद्योग’ हे प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि बदलत्या औद्योगिक धोरणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाची विभागणी प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या भागांत केली आहे. पुस्तकातील प्रकरण-1 केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी-उद्योजकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्यात झचएॠझ, मुद्रा योजना, डींर्रीीींि खपवळर आणि नाबार्ड (छअइअठऊ) यांची भूमिका सविस्तर मांडली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या वित्तीय आणि तांत्रिक संस्थांची मदत घेता येईल. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर पुस्तकाच्या प्रकरण- 2 मध्ये कृषी व्यवसायातील भविष्यकालीन संधी आणि आव्हानांचा वेध घेतला आहे. आजचे जग हे डिजिटल क्रांतीचे आहे, त्यामुळे श-छअच आणि जछऊउ सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा कृषी विपणनात होणारा वापर यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच, हवामान बदलाचे संकट लक्षात घेऊन ‘शाश्वत कृषी उद्योग’ कसा उभारावा, यावरही मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेषतः खान्देशातील यशस्वी कृषी-उद्योजकांच्या यशोगाथांचा (उरीश र्डीींवळशी) समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संधींची प्रेरणा मिळेल. या संबधीची माहिती आहे.
तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे. हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त न ठरता, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास (एपीींशीिशपर्शीीीहळ)ि
मनोगत
4 | प्रशांत पब्लिकेशन्स
आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल एक नवीन दृष्टीकोन निर्माण करेल