Your cart is empty now.
‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.
‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.