Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खानदेश हा विभाग पूरातन काळापासून आपले एक आगळे वेगळे अस्तित्त्व
टिकवून आहे. आरंभापासुनच देशाच्या जडण घडणीत या विभागाने मोलाचे योगदान
दिलेले आहे. असे असले तरी कोणत्याही अंगावर लिखाण न झाल्याने हा विभाग
अलिकडच्या...

  • Name : खानदेश लोकसभा प्रतिनिधी
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385021213
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खानदेश लोकसभा प्रतिनिधी
- +

खानदेश हा विभाग पूरातन काळापासून आपले एक आगळे वेगळे अस्तित्त्व
टिकवून आहे. आरंभापासुनच देशाच्या जडण घडणीत या विभागाने मोलाचे योगदान
दिलेले आहे. असे असले तरी कोणत्याही अंगावर लिखाण न झाल्याने हा विभाग
अलिकडच्या काळापर्यंत विशेष नावारूपाला आलेला नव्हता. काही वर्षापासून
येथिल लोखकांनी खानदेशाच्या विविध विषयांना अनुसरून लेखन सुरू केल्यामुळे
येथिल विविध पैलू उजेडात येत आहेत. राजकीय योगदानाचा विचार केल्यास
ब्रिटीश काळापर्यंत अनेक राजवटी येथे स्थिरावल्या आणि विविध ठसा उमटवून
गेल्या. ब्रिटीशांविरोधी स्वातंत्र्य आंदोलनातही खानदेश अग्रेसर होता. राष्ट्रीय काँग्रेसचे
ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन भरविण्याचा मान फैजपूरने मिळविला. तर साने
गुरूजी, धनाजी नाना, डॉ. उत्तमराव पाटील, सौ. लिलाताई यासारख्या स्वांतत्र्य
सैनिकांनी खानदेश पेटता ठेवला.
स्वातंत्र्यानंतरही देश पातळीवरील खानदेशाच्या योगदानात सातत्य टिकून
आहे. येथील लोक नेत्यांनी केंद्र सरकारच्या तसेच विधीमंडळाच्या विविध कामकाजात
सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय विकासात मोलाची भर घालण्यास हातभार लावला
आहे. मात्र त्यांच्या कार्यावर अद्याप कोणतेही लिखान न झाल्याने त्यांच्या
कार्यतत्परतेचा त्यांच्या राजकीय सक्रियतेचा विशेष उल्लेख वाचायला किंवा
अभ्यासायला मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय विकासाच्या वाटचालीत खानदेशाचा
सहभाग आहे की नाही? असा अनेकांच्या मनात संभ्र निर्माण होतो. तो संभ्र
कमी व्हावा राजकारणात येणाऱ्या नवागतांना राजकारणाची माहिती मिळावी खानदेश
नेतृत्त्वाच्या राष्ट्रीय योगदानाबद्दल येथील तरूणांना अभिमान वाटावा अशा विविध
उद्देशांनी खानदेशातील लोकप्रतिनिधींनी निभावलेल्या राष्ट्रीय व मतदार संघाविषयीच्या
महत्त्वाच्या भूमिकांची सविस्तर मांडणी या पुस्तकात करण्याचा हेतु आहे.

प्रकरण - 1. प्रस्तावना ............................................ 11

प्रकरण - 2. खानदेशातील भौगोलिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती.. 16

प्रकरण - 3. भारतीय संसद आणि प्रतिनिधी ....................... 31

प्रकरण - 4. संसदेतील खानदेश ................................... 44

प्रकरण - 5. जळगांव जिल्ह्यातील लोकसभा सदस्य ................ 57

प्रकरण - 6. धुळे जिल्ह्यातील लोकसभा सदस्य .................. 104

प्रकरण - 7. नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा सदस्य............... 130

प्रकरण - 8. समालोचन ......................................... 144

संदर्भ सूची ......................................... 151

💬

Chat with us