Your cart is empty now.
एखाद्या प्रदेशाची संस्कृती तेथे वास्तव्य करणाऱ्या मानवाची जीवनशैली, मूल्ये, विश्वास आणि प्रथा यांचे एकत्रित दर्शन घडवित असते व हेच एकत्रितपण इतरांपेक्षा वेगळेपण जपून ठेवत असते.
संस्कृतीचा विकास स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय पातळीवर होत असते. तेथील प्रक्रियेवर ऐतिहासिकतेवर तो अवलंबून असतो. संस्कृतीत कला, विज्ञान, संगीत, नृत्ये, परंपरा, सण उत्सव, वेशभूषा या सर्वच घटकांचा अंतर्भाव होतो.
खान्देशातील परंपरा व संस्कृती अभ्यासतांना संस्कृतीची आत्मसातता व अध्ययन, सामाजिक गटातील सामाईकता, संस्कृतीचे प्रवाही रूप, परिवर्तन कालपरत्वे होणारे बदल अनुभवणे शक्य होईल. या अभ्यासामुळे सुव्यवस्थित जीवन जगण्याची कल्पना, आदर्श आणि मूल्यांची स्विकार्यता करणे सोपे होईल. खान्देशातील वैविध्यत ऐतिहासिक साधने, आहार, परंपरा साहित्यिक व बौद्धीक कामगिरी, ऐतिहासिक वैशिष्ट्ये जाणून घेणे शक्य होईल. खान्देशाचा इतिहास व अहिराणीचा इतिहास या विषयांशी समर्पित ब्लॉग, युट्युबवरील व्हिडिओ, अभ्यासपूर्ण चर्चा, मुलाखती व खान्देशाच्या इतिहासाचे जाणकार यांनी केलेले संदर्भ लेखन यांचा प्रस्तुत ग्रंथलेखनाकामी उपयोग करण्यात आला आहे.