Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

अलीकडील वीस ते पंचवीस वर्षात तंत्रज्ञानाचा विकास झाल्यापासून माणसाची प्रगती मोजण्याचे निकष किंवा निर्देशक बदललेले दिसतात. भौतिक सुख सोयींना महत्त्व आलेले दिसते. भौतिक सुख सोयी उपलब्ध करून देणारा पैसा सर्वोच्च महत्त्वाचा...

  • Name : चारित्र्य - शुद्ध अंत : करणाचे प्रकटीप्रकरण
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Barcode : 9789377769109
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

चारित्र्य - शुद्ध अंत : करणाचे प्रकटीप्रकरण
- +

अलीकडील वीस ते पंचवीस वर्षात तंत्रज्ञानाचा विकास झाल्यापासून माणसाची प्रगती मोजण्याचे निकष किंवा निर्देशक बदललेले दिसतात. भौतिक सुख सोयींना महत्त्व आलेले दिसते. भौतिक सुख सोयी उपलब्ध करून देणारा पैसा सर्वोच्च महत्त्वाचा ठरला आहे. कोणत्या का भ्रष्ट किंवा अनैतिक मार्गाने असेना, ज्याला जास्त पैसा कमावता येईल तो मनुष्य श्रेष्ठ समजला जात आहे. अशा माणसाची समज, बुद्धी आणि व्यक्तिमत्त्व मोठं असे पण लोकांना वाटू लागले आहे. यामुळेच संपूर्ण देशभरात राजकारण हे पैसा कमावण्याचे मोठे साधन ठरत आहे. पैसा असला की हमखास निवडणूक जिंकता येते आणि सत्ता प्राप्त झाली की पुन्हा पैसा कमावता येतो. पैसा आणि सत्ता असले की आपोआप प्रतिष्ठा मिळते, असं जणू सूत्र बनलेलं आहे. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत राजकारणाबद्दल आकर्षण वाढलेले आहे. व्यक्तिमत्त्व मोजण्याचे अलीकडचे निकष म्हणजे कमी अवधीत भरपूर पैसा, सत्ता व प्रतिष्ठा कमावण्याची क्षमता! पैसा कमावण्याचे साधन योग्य असो की अयोग्य, पैसा कमावतांना साधनशुचितेचे पालन होवो अथवा न होवो, गडगंज पैसा कमावणारा स्मार्ट समजला जात आहे. धनवान आपोआप बुद्धिवंत समजला जात आहे. सरकारी पैशांचा अपहार करणारा, समाजाचे शोषण करणारा, आपल्या पोरा बाळांसाठी चोरी करणारा, आत्मकेंद्रित मनुष्य निकृष्ट दर्जाचा असला तरी समाजकारणी आणि मौल्यवान समजला जात आहे. समाजातील ज्या लोकांचा कोणत्याही मूल्यांची संबंध नाही. अशांना प्रतिष्ठित मानलं जात आहे. “व्यापार सचोटीने करावा, संपत्ती कष्टाने कमवावी” असे महात्मा गांधींनी सांगून ठेवलेले आहे. या तत्त्वांचा वापर करून प्रामाणिकपणे संपत्ती कमवणारे व्यापारी, उद्योजक, बुद्धिवंत इत्यादींमध्ये कष्ट करण्याचा प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता असते. यांनी कमावलेल्या संपत्तीतून हे प्रामाणिकपणे देशाचा कर भरतात, अनेक बेरोजगारांना रोजगार देतात, समाजात सुख शांती निर्माण करण्यासाठी यांचेही योगदान असते. म्हणजे यांच्यात “व्यक्तिमत्त्व नीतिमत्ता किंवा व्यक्तिमत्त्व मूल्ये” असतात असे म्हणता येते.
लोकभावनांच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्रउद्धारासाठी समर्पित जीवन जगणारे, परदुःख दूर करण्यासाठी झटणारे परोपकारी लोक हे राष्ट्रीय पुरुष असतात. हे प्रामाणिक असतात, नैतिक असतात, सेवाभावी असतात, त्याग भावना जोपासणारे असतात, जबाबदार असतात, व्यापक समदृष्टीचे असतात, सहनशील असतात, न्यायी असतात, विवेकी असतात, विज्ञाननिष्ठ असतात,
सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असतात, यांच्यात तत्त्वाधिष्ठित धारणा असतात, हे परोपकारी असतात, अग्रकर्मी असतात, समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ असतात, हे आध्यात्मिक असतात, प्रतिभावंत असतात. प्रज्ञावंत असतात म्हणजे ते जीवनभर ‘चारित्र्यमूल्ये’ जोपासतात. ते चारित्र्यसंपन्न असतात.
आजचा काळ हा झगमगाट, गती, स्पर्धा आणि दृश्य यशाचा आहे. पद, पैसा, प्रसिद्धी, कौशल्य, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास यांनाच यशाची मुख्य मोजमापे मानली जात आहेत. व्यक्तीचे मूल्यमापन बहुधा तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा सादर होतो यावर आधारित होत आहे. परंतु या सर्व बाह्य निकषांच्या गर्दीत एक अत्यंत मूलभूत, परंतु निर्णायक घटक हळूहळू विस्मरणात जात आहे, तो म्हणजे चारित्र्य! प्रामाणिकपणा, नैतिकता, जबाबदारी, आत्मसंयम, निष्ठा, कर्तव्यबुद्धी, करुणा, सत्यनिष्ठा आणि मूल्यनिष्ठ जीवनशैली हे गुणधर्म केवळ नैतिक भाषणांचे विषय राहिले असून, प्रत्यक्ष मूल्यमापनातून ते दूर सरकत चालले आहेत. आज माणूस काय आहे यापेक्षा तो कसा भासतो याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे चारित्र्य हा व्यक्तीच्या आंतरिक विकासाचा जो खरा निर्देशक आहे, तो समाजाच्या मोजपट्टीतून जणू गायब झाला आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सुविधा यांच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे मानवाने बाह्य विकासात प्रचंड झेप घेतली आहे. परंतु याच वेगात आंतरिक विकास मात्र मागे पडलेला दिसतो. आजचा आधुनिक मानव अधिक सक्षम आहे; पण तो अधिक समाधानी आहेच असे नाही. तो अधिक जाणकार आहे; पण अधिक संवेदनशील झाला आहेच असे नाही. ताणतणाव, असुरक्षितता, स्पर्धा, नैराश्य, आत्मकेंद्रितता, मूल्यसंघर्ष, नातेसंबंधातील ताण, नैतिक संभ्रम ही सर्व लक्षणे आधुनिक मानवाच्या आंतरिक संकटाचीच रूपे आहेत. हा संघर्ष केवळ आर्थिक किंवा सामाजिक नाही; तो मुळात आत्मिक व नैतिक आहे. या पार्श्वभूमीवर आंतरिक विकास हा ऐच्छिक विषय न राहता, तो मानवाच्या संतुलित, आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी अनिवार्य गरज बनला आहे आणि आंतरिक विकासाचे सर्वात ठोस, दृश्यमान आणि विश्वसनीय मोजमाप म्हणजे चारित्र्य!
आधुनिक काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ ही एक मोठी उद्योगव्यवस्था बनली आहे. आत्मविश्वास, सादरीकरण, प्रभावी संभाषण, देहबोली, आकर्षक प्रतिमा, नेटवर्किंग हे सर्व कौशल्ये निश्चितच उपयुक्त आहेत. परंतु ही सर्व साधने प्रामुख्याने बाह्य प्रतिमेशी संबंधित आहेत. याउलट चारित्र्य हे आंतरिक वास्तवाशी संबंधित असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकांना आपण कसे दिसतो, तर चारित्र्य
म्हणजे आपण प्रत्यक्षात कसे आहोत. व्यक्तिमत्त्व मंचावर घडते; चारित्र्य एकांतात घडते. व्यक्तिमत्त्व प्रसंगानुसार बदलू शकते; चारित्र्य मात्र सवयींमधून, निर्णयांमधून आणि मूल्यांमधून घडत जाते. या दोहोंमध्ये गोंधळ निर्माण झाला की समाजात एक मोठा भ्रम निर्माण होतो. ‘चांगले सादरीकरण म्हणजे चांगली माणुसकी’ हा भ्रम मोडून काढणे आणि वास्तव समोर आणणे हे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. ‘चारित्र्य-शुद्ध अंतःकरणाचे प्रकटीकरण’ हे पुस्तक केवळ नैतिक उपदेशांचे संकलन नसून, ते आंतरिक विकासाच्या शास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक आणि व्यवहार्य समजुतीवर आधारित आहे. या पुस्तकाची भूमिका अशी आहे की चारित्र्याची संकल्पना आधुनिक संदर्भात पुनर्स्थापित करणे; आंतरिक विकासाला शैक्षणिक, वैयक्तिक आणि सामाजिक केंद्रस्थानी आणणे; व्यक्तिमत्त्व व चारित्र्य यांतील मूलभूत फरक स्पष्ट करणे; जीवनातील निर्णय, सवयी, नाती आणि नेतृत्व यांमध्ये चारित्र्याचे महत्त्व अधोरेखित करणे; वाचकाला केवळ यशस्वी नव्हे, तर मूल्याधिष्ठित, संतुलित आणि अर्थपूर्ण मानव बनण्याच्या दिशेने प्रवृत्त करणे.
हे पुस्तक वाचकाला एक मूलभूत प्रश्न विचारायला लावते, “मी कसा दिसतो?” यापेक्षा “मी आतून कोण आहे?” कारण अखेरीस, माणसाचा खरा विकास हा त्याच्या पदावर, प्रसिद्धीवर किंवा कौशल्यांवर नव्हे, तर त्याच्या चारित्र्यावर मोजला जातो आणि चारित्र्य हेच आंतरिक विकासाचे सर्वात विश्वासार्ह, शाश्वत आणि सत्य निर्देशक आहे.           

भाग 1 : चारित्र्य आणि आंतरिक विकास
प्रकरण 1: चारित्र्याची तात्त्विक पायाभरणी......................17
1) चारित्र्य म्हणजे काय? संकल्पना, अर्थ व व्याप्ती, 2) सद्गुणांची परंपरा:भारतीय व पाश्चात्त्य दृष्टिकोन, 3) चारित्र्य आणि नैतिक तत्त्वज्ञान, 4) चारित्र्य व आत्मा:आध्यात्मिक परिमाण, 5) चारित्र्य आणि विवेक:निर्णय प्रक्रियेतील भूमिका

प्रकरण 2: आंतरिक विकासाची प्रक्रिया.......................19
1) आंतरिक विकास म्हणजे काय? 2) आत्मबोध : चारित्र्य विकासाचा प्रारंभबिंदू, 3) धारणा आणि चारित्र्य निर्मिती, 4) सवयी, वृत्ती आणि चारित्र्य, 5)अंतर्मन, भावनात्मक शिस्त आणि आत्मसंयम

प्रकरण 3: चारित्र्याचे मूलभूत स्तंभ............................21
1) सत्यनिष्ठा : चारित्र्याचा कणा, 2) जबाबदारी : आंतरिक प्रगल्भता, 3) संयम व आत्मनियंत्रण, 4) नम्रता आणि आत्मसन्मान, 5) धैर्य आणि नैतिक दृढता, 6) करुणा आणि मानवता, 7) निष्ठा आणि विश्वासार्हता

प्रकरण 4 : चारित्र्य व आधुनिक विचारप्रवाह........................24
1) आधुनिक जग वेगाने बदलत आहे., 2) Character Ethics विरुद्ध Personality Ethic, 3) स्टीफन आर. कोवे : तत्त्वाधिष्ठित चारित्र्य विकास, 4)Inside-Out परिवर्तन सिद्धांत, 5) Private Victory : आंतरिक विजयाची संकल्पना, 6) चारित्र्य आणि नेतृत्व, 7) चारित्र्य आणि व्यवस्थापन, 8) चारित्र्य व शिक्षण

प्रकरण 5: चारित्र्यनिर्मितीचा अंतर्मुख प्रवास-मनविजय ते जनविजय............27
1) मन विजय : चारित्र्याचा अंतःस्रोत, सवय 1:अग्रकर्मी व्हा - पुढाकार घ्यायला शिका, सवय 2 :शेवट डोळ्यांसमोर ठेवा, सवय 3:महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. 2) जनविजय : चारित्र्याचे सामाजिक रूप, सवय 4:जिंकू जिंकू विचारधारा, सवय 5: आधी समजून घ्या, मग समजावून सांगा, सवय 6:समन्वय साधा- सहकार्य, स्वीकारशीलता, समन्वय,
3) सवय 7 :आरीला धार लावा, 4) चारित्र्य आणि स्टीफन कोवे-आंतरिक विकासाची चौकट

प्रकरण 6: चारित्र्य आणि जीवनव्यवहार............................34
1) कुटुंबातील चारित्र्य निर्मिती, 2) शिक्षक व चारित्र्य घडवणूक,
3) व्यावसायिक जीवनात चारित्र्य, 4) सार्वजनिक जीवन व नैतिक जबाबदारी, 5) चारित्र्य आणि सामाजिक विश्वास

प्रकरण 7: चारित्र्य, प्रज्ञा आणि आत्मविकास...................36
1) चारित्र्य आणि बुद्धिमत्ता, 2) चारित्र्य आणि प्रतिभा, 3) चारित्र्य आणि प्रज्ञा, 4) अहंकार विरुद्ध आत्मपरिपक्वता, 5) आत्मशुद्धी आणि चारित्र्य परिष्कार

प्रकरण 8: चारित्र्य विकासाचे व्यावहारिक मॉडेल.............38
1) चारित्र्य विकासाचे टप्पे, 2) स्वयंमूल्यमापन साधने, 3) चारित्र्य आणि दैनंदिन साधना, 4) मूल्याधिष्ठित निर्णय प्रक्रिया, 5) चारित्र्य विकासासाठी ‘वैयक्तिक चारित्र्य विकास आराखडा’

प्रकरण 9: चारित्र्य आणि आधुनिक मानसशास्त्र.................41
1) चारित्र्य विरुद्ध व्यक्तिमत्त्व, 2) सवयी आणि कंडिशनिंग, 3) आत्मनियंत्रण, 4) नैतिक विकास, 5) सकारात्मक मानसशास्त्र, 6) संज्ञानात्मक-भावनिक एकात्मता, 7) सामाजिक मानसशास्त्र

प्रकरण 10: चारित्र्यसंपन्नता आणि आध्यात्मिकता यांचा संबंध....43
1. आध्यात्मिकता = आंतरिक शुद्धी आणि चारित्र्य = बाह्य अभिव्यक्ती.,
2. आत्मज्ञान आणि नैतिकता, 3. इच्छांवर विजय = आध्यात्मिकता, संयम = चारित्र्य, 4. अहंकारक्षय आणि नम्रता (विनय), 5. अंतःप्रेरणा आणि चारित्र्य, 6. सेवा, त्याग आणि प्रेम, 7. केवळ धार्मिकता चारित्र्य

प्रकरण 11: चारित्र्यसंपन्न व्यक्ती घडवणे.............................46
1) स्व-अवलोकन, 2) नैतिक मूल्ये आत्मसात करणे, 3) इच्छांवर आणि वासनांवर संयम, 4) सवयी निर्माण करणे, 5) शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, 6) सामाजिक निष्ठा, 7) सतत शिक्षण आणि स्वाध्याय,
8) नैतिक धैर्य आणि निर्णयक्षमता, 9) ध्यान व आध्यात्मिक साधना,
10) सुसंवाद + आदर्श व्यक्तींचे अनुकरण

प्रकरण 12: इच्छा तसे चारित्र्य....................................49
1) इच्छा, 2) प्रेच्छा, 3) संकल्प, 4) कृती, 5) कृतींची सवय,
6) चारित्र्य

प्रकरण 13: अतिपरिणामकारक व्यक्ती चारित्र्यसंपन्न असतातच का?..............51
1) परिणामकारकता आणि चारित्र्य यात फरक, 2) स्टीफन कोवे यांचा दृष्टिकोन:, 3) इतिहास आणि वास्तवातील उदाहरण:, 4) खरे चारित्र्यसंपन्न परिणामकारक लोक कसे असतात?

भाग 2: हिंदू वैदिक तत्त्वज्ञानाचे चरित्र घडवण्यासाठी योगदान
प्रकरण 14: उपनिषदांच्या दृष्टीने चारित्र्य........................54
1) अंतःकरणशुद्धी - चारित्र्याचा पाया, 2) सत्य - चारित्र्याचा कणा, 3) संयम (दम) आणि शिस्त (तप):, 4) दान, दया आणि करुणा,
5) सदाचार - आत्मज्ञानाची पात्रता, 6) वैराग्य - चारित्र्याची परिपक्वता,
7) आत्मसंयम आणि आत्मज्ञान यांचा अविभाज्य संबंध

प्रकरण 15: योगशास्त्र....................................56
1) अष्टांग योगाच्या आठ शाखा, 2) योग-शास्त्राचाचारित्र्य निर्मितीशी संबंध,

प्रकरण 16: भगवद्गीता.........................................58
1) दैवी संपत्ती (दैवी गुण) - चारित्र्याचा आदर्श, 2) कर्मयोग,
3)स्थितप्रज्ञाची लक्षणे: चारित्र्याचा परिपूर्ण नमुना, 4) त्रिगुण सिद्धांत - चारित्र्याचे तीन स्तर, 5) श्रद्धा, आहार, तप, दान-चारित्र्यनिर्मितीची साधने,
6) भक्तियोग - चारित्र्याचा अंतःप्रेरित मार्ग.

भाग 3: भारतीय महात्म्यांचे चारित्र्यविषयक विचार
प्रकरण 15 भगवान गौतम बुद्ध.....................................61
1) शील - चारित्र्याचा पाया:, 2) पंचशील - व्यवहार्य चारित्र्यसंहिता,
3) अष्टांगिक मार्ग - चारित्र्याचा संपूर्ण विकास, 4) करुणा आणि मैत्री,
5) तृष्णा, लोभ, द्वेष, मोह - चारित्र्याचे शत्रू, 6) आत्मशुद्धी आणि आत्मजागर

प्रकरण 16: भगवान महावीर..................................63
1) चारित्र्य म्हणजे आत्मसंयम, 2) त्रिरत्न - सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, 3) पंचमहाव्रते - चारित्र्याची शिस्तबद्ध चौकट,
4) अहिंसा -चारित्र्याचे केंद्रबिंदू तत्त्व, 5) तप आणि त्याग - चारित्र्याचा कस, 6) चारित्र्य - कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग

प्रकरण 17: आदि शंकराचार्य...............................65
1. चित्तशुद्धी - चारित्र्याचा पाया, 2. साधनचतुष्टय - चारित्र्यनिर्मितीची चौकट, 3. अद्वैत आणि नैतिकता, 4. संन्यास नव्हे, तर आंतरिक वैराग्य, 5. ज्ञान आणि चारित्र्य यांचे नाते, 6. उपदेशसाहस्री व विवेकचूडामणीतील भाव(भावार्थ), 7. चारित्र्य = आंतरिक विकास

प्रकरण 4: गुरु नानकदेव. ........................68
1) चारित्र्याची सुरुवात अंतःकरणातील शुद्धतेपासून, 2) नामस्मरण - चारित्र्याची अंतर्गत शिस्त, 3) सत्य (सच) - चारित्र्याचा कणा, 4) किरत करो - प्रामाणिक श्रम, 5) वंड छको - सामाजिक चारित्र्य, 6) अहंकार (हौमै) - चारित्र्याचा सर्वात मोठा शत्रू, 7) स्त्री-पुरुष समता - चारित्र्याची सामाजिक परिपक्वता

प्रकरण 5: संत तुकाराम महाराज.................................. 70
1) आचरणाला महत्त्व, 2) अंतःकरणाची शुद्धता, 3) सत्य आणि प्रामाणिकपणा, 4) नम्रता व अहंकारशून्यता, 5) भक्ती आणि नीती यांची एकता

प्रकरण 6: संत ज्ञानेश्वर महाराज. ........................71
1) अंतःकरणाची शुद्धता - चारित्र्याचा पाया., 2) समत्वबुद्धी - श्रेष्ठ चारित्र्याचे लक्षण, 3) कर्मशुद्धी - आचरणातून चारित्र्य, 4) अहंकाराचा क्षय - चारित्र्याची उंची, 5) भक्ती, ज्ञान आणि नीती यांचा समन्वय,
6) करुणा आणि लोककल्याण

प्रकरण 7: स्वामी विवेकानंद. ...................................73
1. चारित्र्य म्हणजे सवयींचा साठा, 2. विचार कृती सवय चारित्र्य भाग्य, 3. चारित्र्य हे शिक्षणाचे अंतिम ध्येय:, 4. आत्मबल आणि चारित्र्य,
5. ब्रह्मचर्य व संयम - चारित्र्याची ऊर्जा, 6. सत्य, निःस्वार्थता आणि सेवा, 7. चारित्र्य आणि राष्ट्रनिर्मिती, 8. चारित्र्य = आंतरिक विकास

भाग 4 : विश्वविख्यात विचारवंतांचे चारित्र्यविषयक विचार
प्रकरण 24: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. .........................77
1. चारित्र्य म्हणजे कर्तव्यनिष्ठा, 2. निर्भयता - चारित्र्याचा कणा, 3. स्वराज्य व चारित्र्य, 4. त्याग आणि तपश्चर्या,
5. शिस्त आणि आत्मसंयम, 6. लोकशिक्षण व चारित्र्यनिर्मिती, 7. धर्म, गीता आणि चारित्र्य, 8. चारित्र्य आणि राष्ट्रनिर्मिती

प्रकरण 25: महात्मा गांधी. ...............................79
1. चारित्र्य = सत्य, 2. अहिंसा - चारित्र्याची सर्वोच्च अभिव्यक्ती, 3. विचार-वचन-कृती यांची एकता, 4. आत्मसंयम आणि ब्रह्मचर्य, 5. साधेपणा आणि अपरिग्रह, 6. सेवा, श्रम आणि निःस्वार्थता, 7. साधनशुचिता, 8. चारित्र्य आणि स्वराज्य, 9. चारित्र्य = आंतरिक विकास, 10. गांधीजींनी सांगितलेली “7 सामाजिक पापे”:

प्रकरण 26: स्वातंत्र्यवीर वीर विनायक दामोदर सावरकर.........82
1. धैर्य - चारित्र्याचा कणा, 2. स्वाभिमान व आत्मगौरव, 3. राष्ट्रनिष्ठा - सामूहिक चारित्र्य, 4. विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा,
5. सामाजिक सुधारणा व चारित्र्य, 6. कृतिशीलता - निष्क्रिय नैतिकतेवर टीका, 7. आत्मबल व मानसिक कठोरता, 8. चारित्र्य आणि राष्ट्रनिर्मिती

प्रकरण 27: विनोबा भावे.........................................85
1) चारित्र्य = अंतःकरणाची शुद्धता, 2) सत्य आणि अहिंसा - चारित्र्याचे मूळ, 3) त्याग आणि साधेपणा:, 4) सेवा हीच चारित्र्याची खरी कसोट, 5) आत्मशिस्त, 6) चारित्र्य हे समाजपरिवर्तनाचे साधन, 7) अध्यात्म आणि चारित्र्य यांची एकता.

प्रकरण 28: डॉ. बाबासाहेब आंबेडकर............................87
1) चारित्र्य आणि सामाजिक न्याय, 2) स्वाभिमान - चारित्र्याचा कणा, 3) विवेक, शिक्षण आणि चारित्र्य:, 4) नैतिकता आणि धर्म, 5) चारित्र्य विरुद्ध ढोंग, 6) नैतिक धैर्य

प्रकरण 29ः सर्वपल्ली राधाकृष्णन.................................89
1) चारित्र्य = नैतिक व्यक्तिमत्त्व, 2) चारित्र्य आणि शिक्षण, 3) चारित्र्य = स्वतंत्र विचार + विवेक, 4) चारित्र्य आणि समाज, 5) चारित्र्य आणि आध्यात्मिक मूल्ये

भाग 5 : जागतिक कीर्तीच्या तत्त्ववेत्यांचे चारित्र्यविषयक विचार
प्रकरण 30: सॉक्रेटिस............................................92
1) सॉक्रेटिस यांचे प्रसिद्ध मत, 2) आत्मपरीक्षण: चारित्र्याचा आरसा, 3) आत्मसंयम, 4) न्याय आणि नैतिक धैर्य, 5) अंतःकरणाचा आवाज, 6) चारित्र्य हे संपत्तीपेक्षा श्रेष्ठ

प्रकरण 31: प्लेटो..............................................94
1) आत्म्याचे तीन भाग - चारित्र्याची रचना, 2) चार प्रमुख सद्गुण - आदर्श चारित्र्य, 3) न्याय = आत्म्याचा समतोल, 4) शिक्षण आणि चारित्र्यनिर्मिती, 5) इच्छांवर संयम - चारित्र्याची कसोटी, 6) सद्गुण = आत्म्याचे आरोग्य

प्रकरण 32: ॲरिस्टॉटल..................................96
1) चारित्र्य = सवयींचा परिणाम, 2) सद्गुण = मध्यम मार्ग, 3) सद्गुण दोन प्रकारचे, 4) विवेक- चारित्र्याचा मार्गदर्शक, 5) चारित्र्य आणि आनंद,
6) कृतीपूर्व निवड

प्रकरण 33: इमॅन्युअल कांट............................98
1) सद्भावना - चारित्र्याचा गाभा, 2) कर्तव्यबुद्धी (र्ऊूीीं) - चारित्र्याचा कस, 3) श्रेणीबद्ध नैतिक आज्ञा- कांट यांचा मध्यवर्ती सिद्धांत, 4) व्यक्ती म्हणून आदर, 5) स्वायत्तता - चारित्र्याची परिपक्वता, 6) प्रवृत्ती विरुद्ध नैतिकता

प्रकरण 34: अल्बर्ट आईन्स्टाईन..................................100
अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे चारित्र्यावर विचार

प्रकरण 35: अब्राहम लिंकन.........................101
1) चारित्र्याची खरी परीक्षा - सत्ता, 2) प्रतिष्ठा आणि चारित्र्य,
3) नैतिकता विरुद्ध सोय. 4) प्रामाणिकपणा -केपशीीं अलश:, 5) करुणा आणि मानवता, 6) चारित्र्य आणि नेतृत्व:

प्रकरण 36: अब्राहम मेस्लो........................103
1) गरजांची श्रेणी आणि चारित्र्य, 2) व्यक्तींची वैशिष्ट्ये म्हणजेच उच्च चारित्र्य, 3) चारित्र्य मूल्ये, 4), 5) स्व-प्रतिमा आणि प्रामाणिकता, 6) चारित्र्याची सर्वोच्च पातळी

उपसंहार.................................................................... 105
1) चारित्र्य : आंतरिक विकासाचा खरा निर्देशक, 2) चारित्र्य आणि मानवी भविष्य

संदर्भ ग्रंथसूची....................................................................107

💬

Chat with us