Your cart is empty now.
तुझ्या प्रथमदर्शनी प्रेमाची अव्यक्त, अदृश्य, सृजन प्रेमोर्जा प्रेरणेत मिसळली. 84 वर्षाच्या आयुष्यात कामगाराच्या कविता, अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 ते 3, सण आणि उत्सव, नाती-गोती, वानोया या चीरा घडविल्या. सन्मानात ‘साहित्य अकादमी, दिल्ली’ (2000) पर्यंत वर चढत गेलो. खान्देशभूषण, समाजभूषण, अहिराणीरत्न, खान्देशरत्न या बिरूदावल्या ‘पालक’-तक्ता झाल्या. यशाचा उंच बुरुज निर्माण होतांना तूच भली मोठी भरभक्कम ‘चीरा’ राहीली.