Your cart is empty now.
आधुनिक काळात धकाधकीच्या जीवनापासून मनाला शांती मिळण्यासाठी व विरंगुळासाठी मानव निसर्गरम्य अशा स्थळी जाणे पसंत करतो. त्यातूनच पर्यटन विकसित झाले अलीकडे पर्यटन हे अत्यावश्यक झाल्याने जगातील सर्वच देशात पर्यटनाचे महत्त्व वाढलेले आहे. म्हणजे पर्यटन ही एक अत्यावश्यक गरज झालेली आहे. प्रवास व पर्यटन हा जगातील अग्रेसर जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त करून देणारा असा व्यवसाय आहे. संपूर्ण जगात पर्यटनाचा विकास एक आर्थिक क्रिया म्हणून होत असल्याने पर्यटन हा एक ‘अदृश्य व्यापार’ म्हणून संबोधला जातो. यामुळे पर्यटनाचे आर्थिक स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनाला विशेष महत्त्व समाज व राजकारण, पर्यावरण व सांस्कृतिक घटकांचे जतन, संवर्धन व संरक्षण यादृष्टीने ही आहे. अतिप्राचीन काळापासून प्रवास करणे हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. पर्यटन ही आधुनिक व शास्त्रीय संकल्पना म्हणून उदयाला आलेली आहे.