Your cart is empty now.
खरे पाहता कादंबरी किंवा पुस्तक लिहीणे कधी माझ्या मनातही नव्हते. याबाबतीत माझ्या दप्तरातील पाटी ही नेहमीच कोरी होती. परंतु ज्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या माश्याला पाण्यात पोहण्याचे शिकवावे लागत नाही, त्याचप्रमाणे जीवनातील चढउतार बरेच काही शिकवून जातात. त्याचीच पूर्तता मी ‘पैसा कमावला, पण... बाप गमावला..!’ या कादंबरीतून करण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाने आयुष्यात चुकताना त्यातून काही शिकायलाही हवं आणि शिकताना त्यातुन काही चुकायलाही हवं या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतू एखाद्या बाजूचा अतिरेक हा आपले आयुष्य अशा ठिकाणी नेऊन सोडतो, ज्याचा ‘धडा’ तुम्हाला या कादंबरीतून घेता येईल.