Welcome to Prashant Publications

Rs. 310.00
Availability: 10 left in stock

प्रस्तुत ग्रंथामध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण, पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब...

  • Name : प्राकृतिक भूगोल : शिलावरण, वातावरण आणि जलावरण (Physical Geography : Lithosphere, Atmosphere & Hydrosphere)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | Sem - I & II
  • Manufacturing : 2026 / 03 / 20
  • Barcode : 9788197812163

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राकृतिक भूगोल : शिलावरण, वातावरण आणि जलावरण (Physical Geography : Lithosphere, Atmosphere & Hydrosphere)
- +

प्रस्तुत ग्रंथामध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण, पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

१. प्राकृतिक भूगोलाची ओळख (Introduction to Physical Geography) ...... १३
१.१ भूगोल : व्याख्या आणि शाखा (Geography: Definition, Branches)
१.२ प्राकृतिक भूगोलाची तोंडओळख (Introduction to Physical Geography)
१.३ पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय (Introduction to the Origin of the Earth)
१.४ काल्पनिक रेषा (Imaginary lines)
१.४.१ पृथ्वीचा अक्ष/आस (Earth Axis)
१.४.२ विषुववृत्त (Equator)
१.४.३ कर्कवृत्त आणि मकरवृत्त (Tropic of Cancer & Capricorn)
१.४.४ आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त (Arctic and Antarctica Circle)
१.४.५ ध्रुववृत्त (Pole)
१.४.६ अक्षंश आणि रेखांश (Parallels of latitude and Meridians of Longitudes)
१.५ पृथ्वीची गती (Motions of the Earth)
१.५.१ पृथ्वीचे परिवलन आणि त्यांचे परिणाम (Rotation of the Earth and its Effects)
१.५.२ पृथ्वीचे परिभ्रमण आणि त्यांचे परिणाम (Revolution of the Earth and its Effects)

२. आपली पृथ्वी/वसुंधरा (The Earth) ...... ३६
२.१ पृथ्वीचे अंतरंग (Interior of the Earth)
२.१.१ भूकवच (The Crust)
२.१.२ प्रावरण (Mantle)
२.१.३ गाभा (Core)
२.२ खंड व महासागर यांची निर्मिती आणि वैशिष्ट्ये व सध्याचे वितरण (Origin and Characteristics of Present Distribution of Continents and Oceans)
२.३ भूखंड व महासागरांच्या वितरणाशी संबंधित सिद्धांत (Theories related to the Distribution of Continents & Oceans)
२.३.१ वेगनरचा खंडवहन सिद्धांत (Wegner’s Continental Drift Theory)
२.३.२ भूमंच विवर्तन सिद्धांत (Plate Tectonics Theory)

३. खडक व विदारण (Rocks and Weathering) ...... ५९
३.१ खडक (Rocks)
३.१.१ खडकाची व्याख्या (Definition of Rocks)
३.१.२ खडकाचे प्रकार आणि वैशिष्ट्ये (Types and Characteristics of Rocks)
अग्निजन्य खडक (Igneous Rocks)
स्तरित खडक (Sedimentary Rocks)
रूपांतरित खडक (Metamorphic Rocks)
३.२ विदारण (Weathering)
३.२.१ विदारणाची व्याख्या (Definition of Weathering)
३.२.२ विदारणाचे प्रकार (Types of Weathering)
यांत्रिक/कायिक विदारण (Mechanical/Physical Weathering)
रासायनिक विदारण (Chemical Weathering)
जैविक विदारण (Biological Weathering)

४. पृथ्वीच्या शक्ती (Force of the Earth) ...... ८०
४.१ अंतर्गत व बहिर्गत शक्ती (Endogenic & Exogenic Forces)
४.२ अंतर्गत शक्ती (Endogenic Forces)
भूप्रक्षोभ हालचाली (Diastrophic Forces)
भूखंडीय निर्माणकारी हालचाली (Epeirogenic)
पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic)
४.२.१ वलीकरण : व्याख्या आणि प्रकार (Folding : Definition and Types)
(संमित, असंमित, समनत, परिवलित इ. वळ्या)
४.२.२ प्रस्तरभंग : व्याख्या आणि प्रकार (Faulting : Definition and Types)
(सामान्य आणि उलट प्रस्तरभंग व त्यातून निर्माण होणारी भूरूपे - गटपर्वत, खचदरी)
४.३ भूकंप : व्याख्या, कारणे आणि परिणाम (Earthquakes : Definition, Causes and Effects)

५. बाह्यशक्तीची कारके (नदी) (Work of Geomorphic Agents) ...... ९९
५.१ नदीचे क्षरण आणि संचयन कार्य (Mechanism of River Erosion and Deposition)
५.२ नदीचे खनन कार्य (Erosional Landforms)
(घळई, V आकाराची दरी, धावत्या, धबधबे, रांजणखळगे)
५.३ नदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)
(नागमडी वळणे, कुंडलकासार सरोवर, पूरमैदान, पूरतट, त्रिभुज प्रदेश)

६. बाह्यशक्तीची कारके - वारा (Work of Agents : Wind) ...... ११३
६.१ वाऱ्याचे क्षरण आणि संचयन कार्य (Mechanism of Wind Erosion and Deposition)
६.२ वाऱ्याचे खनन कार्य (Erosional Landforms)
(ब्लो आऊट, भूछत्र खडक, यारदांग, झ्युगेन, द्वीपगिरी)
६.३ वाऱ्याचे संचयन कार्य (Depositional Landforms)
(लहरी चिन्हे, वाळूच्या टेकड्या, बारखाण, लोएस)

७. वातावरणाचा परिचय (Introduction to Atmosphere) ...... १२४
७.१ वातावरणाचा अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition of Atmosphere)
७.२ वातावरणाची घटना (Composition of Atmosphere)
(वायू, बाष्प, धुलीकण)
७.३ वातावरणाची संरचना (Structure of Atmosphere)
(तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, उष्मांबर - आयनांबर व बाह्यांबर)

८. सौरशक्ती आणि हवेतील तापमान (Insolation and Air Temperature) ...... १४३
८.१ सौरशक्ती व सौर स्थिरांक यांचा अर्थ आणि व्याख्या (Insolation and Solar Constant)
८.२ पृथ्वी आणि वातावरणाचे ताप संतुलन (Heat Budget of the Earth and Atmosphere)
८.३ सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक (Factors Affecting Distribution of Insolation)
८.४ ऊर्जा, उष्णता, हवेचे तापमान आणि समतापरेषा यांचा अर्थ (Energy, Heat, Temperature and Isotherm)
८.५ तापमानाचे वितरण आणि वितरणावर परिणाम करणारे घटक (Factors Affecting Air Temperature)
८.६ तापमानाचे उभ्या आणि आडव्या दिशेतील वितरण व तापमानाची विपरितता (Inversion of Temperature)

९. वातावरणीय दाब आणि वारे (Atmospheric Pressure and Winds) ...... १७०
९.१ वातावरणीय दाब (Atmospheric Pressure)
(समभाररेषा, वायुभार पट्ट्यांची निर्मिती, पट्ट्यांचे सरकणे व परिणाम)
९.२ वारे (Winds)
(वारे प्रभावित करणारे घटक - वायुभार उतार, कोरिऑलिस शक्ती, घर्षण)
९.२.३ वाऱ्यांचे वर्गीकरण (Classification of Winds)
ग्रहीय वारे (Planetary Winds)
मान्सून वारे (Monsoon Winds)
हंगामी वारे - भूमी/सागरी वारे, पर्वतीय/दरी वारे (Periodical Winds)

१०. आर्द्रता आणि वृष्टी (Humidity and Precipitation) ...... १९८
१०.१ आर्द्रता : व्याख्या आणि प्रकार (Absolute, Specific, Relative Humidity)
१०.२ सांद्रीभवनाची रूपे (Forms of Condensation : Fog, Dew, Frost, Clouds)
१०.३ वृष्टीची रूपे (Forms of Precipitation : Rain, Drizzle, Snow, Sleet)
१०.४ पर्जन्याचे प्रकार (Types of Rainfall : Convectional, Orographic, Cyclonic)
११. जलावरणाचा परिचय (Introduction to Hydrosphere) ...... २१६
११.१ जलावरण संकल्पना आणि अर्थ (Meaning and Concept of Hydrosphere)
११.२ महासागर तळाची सामान्य रचना (Surface Configuration of Ocean Floor)
११.३ अटलांटिक महासागराची तळरचना (Submarine Relief of Atlantic Ocean)
११.४ हिंदी महासागराची तळरचना (Submarine Relief of Indian Ocean)
१२. महासागरजलाच्या हालचाली (Movement of Ocean Water) ...... २३१
१२.१ सागरी प्रवाह : व्याख्या आणि प्रकार (Definition and Types of Ocean Currents)
१२.२ सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये व कारणे (Characteristics and Causes)
१२.३ अटलांटिक व हिंदी महासागरातील सागरी प्रवाह (Currents in Atlantic & Indian Ocean)
१२.४ सागरी प्रवाहाचे परिणाम (Effects of Ocean Currents)

संदर्भ ग्रंथसूची .............................२४७