Your cart is empty now.
त्यास्ना लिखाईनी सुरुवात दिखाले ग्ये त्ये, त्यास्ना नावे तीन पुस्तके दिखतंस त्यामझार 'एकविसाव्या शतकाकडे' हाऊ कवितास्ना संग्रह, अस्मादिक हाई आत्मकथन, 'अवी आणि मीना' हाई धाकला पोहंस्ससाठी लिखेल कादंबरी यान्हा बाजद त्यास्नी लिखाईनी लाईनच बदली जायेल दिखस. त्यान्हं कारण त्यास्नी तपस्या, त्यास्नं निरखर, त्यास्ना अभ्यास, त्यास्नं वाचन, यान्हा जोडमा त्यास्नं खुदनं आत्मपरिक्षण. मी लिखस कांबं? कोन्हगुंंत लिखसं? आन लिखो काय? नई लिखो. या सवालेस्नी त्यास्ना मनले खिदराई सोडं. हाई खिदरावं हामना पारग्य आन त्यास्ले सापडनी मानवतावादनी वाट. तसं दिखाले ग्ये त्ये त्यास्ना मझार एक भू भारी समीक्षक आन भू न्यायी संशोधक श्येज. यान्हबये लोकभासा, लोकपरंपरा, त्यामहातला त्यास्ना बारीकनिरिख अभ्यास हिरदे जायी बठस. खानदेशनी अहिरानी भासाले जो न्याव दिन्हा तो कोल्हेच इसरता येवाव नई. त्याबाजद ग्रामीण आन दलित साहित्यानी लिखाईबी नजरमा भराई अशीच व्हयेल शे. हाईच नई त्ये न्यारा न्यारा पेपरोसगुंंतनी लिखाईमहाबी त्या मव्हरेज रहायनात. आख्या महाराष्ट्रना आन महाराष्ट्रना भाहिरना इद्यापीठमझार त्यास्नी करतबगारी इद्वत्तानाबये आन लिखाईना बये दिनपरदिन जी वाढो लागी रहायनी त्यान्हा अभिमान श्यानासुरता ग्यानीध्यानीस्ले शंभर टक्का शे. आन रहाई हाऊ इस्वास शे.