Your cart is empty now.
स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यावर आधुनिक भारताच्या जडणघडणीचा ध्यास ज्या समाजसुधारक नेत्यांनी घेतला होता. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नवभारताची उभारणी लोकशाही मूल्याद्वारे आणि तिची वाटचाल आदर्श पध्दतीने करून भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्य्र, बेकारी, गरीबी, सामाजिक आणि आर्थिक विषमता, अज्ञान, गुलामीची मानसिकता, ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी आपल्या विचार आणि कार्याद्वारे यशस्वी मात केल्याचे दिसते.
आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी समाजावाद, अलिप्ततावाद, मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयकरण, मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता, शांतता याबरोबरच बहुलधर्मिय, बहुभाषिकतेला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. आज भारतीय लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकशाहीच्या वाटचालीचे आणि यशस्वीतेचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरुंनाच जाते.
Bharatacha Jadanghadnit Pandit Nehrunche Yogdan