Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock


ज्ञान ही मानवाच्या प्रगतीची सर्वात मोठी शक्ती आहे. भारताला प्राचीन काळापासून समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा लाभला असून, शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान, वैद्यक, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रांत भारतीय ज्ञानप्रणालीने जगाला मौल्यवान...

  • Name : भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र व महाराष्ट्रातील शिल्पकला यांचा एक समग्र अभ्यास (Medicine and Sculpture: A Comprehensive Study)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 160 Pages
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र व महाराष्ट्रातील शिल्पकला यांचा एक समग्र अभ्यास (Medicine and Sculpture: A Comprehensive Study)
- +


ज्ञान ही मानवाच्या प्रगतीची सर्वात मोठी शक्ती आहे. भारताला प्राचीन काळापासून समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा लाभला असून, शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान, वैद्यक, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रांत भारतीय ज्ञानप्रणालीने जगाला मौल्यवान योगदान दिले आहे. या समृद्ध परंपरेचा अभ्यास विद्यार्थ्यांना सुलभ आणि अभ्यासक्रमाभिमुख पद्धतीने करता यावा, म्हणून भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र, व शिल्पकला यांचा समग्र अभ्यास करून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. 
“भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र व महाराष्ट्रातील शिल्पकला यांचा एक समग्र अभ्यास” या मुख्य विषयावर आधारित हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हला अत्यंत आनंद होत आहे. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे (2020) मुंबई विद्यापीठाने 2025-26 पासून सुरु होणाऱ्या तृतीय वर्ष कला शाखेच्या NEP वर आधारित अभ्यासक्रमानुसार ’आधुनिक भारतातील भारतीय ज्ञानप्रणाली (मेजर)’, ’भारतातील वैद्यकशास्त्राचा इतिहास (SEC)’ आणि ’महाराष्ट्रातील शिल्पकलेचा इतिहास (MINOR)’ या विषयांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. 
अलिकडे मुंबई विद्यापीठात मराठी माध्यमातून अनेक विद्यार्थी इतिहासाचा अभ्यास करीत आहेत. परंतु त्यांना मराठी भाषेत ग्रंथ उपलब्ध होत नव्हते अशा विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे लिहिला आहे. प्रत्येक विषयातील संकल्पना सोप्या, नेमक्या आणि मुद्देसूद नोट्सच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वाचे घटक, ऐतिहासिक संदर्भ, संकल्पनात्मक मांडणी आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागाचे स्वतंत्र प्रकरण अगदी मुद्देसूद मांडलेले आहे. त्यामुळे हे मुद्दे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणे सोपे जाणार आहे. या पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते ज्ञान उपलब्ध करून देणे एवढाच नसून, भारतीय ज्ञानपरंपरा, वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राच्या समृद्ध शिल्पकलेचा सांस्कृतिक वारसा यांविषयी अभ्यासकांमध्ये अभ्यासाची आवड, चिकित्सक दृष्टी आणि अभिमान निर्माण करणे हा आहे. 
हे पुस्तक तयार करताना विविध संदर्भग्रंथ, संशोधनपर लेख, विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा आधार घेण्यात आला आहे. 

प्रकरण 1............................................................9
भारतीय ज्ञान प्रणालीचा पाया आणि आधुनिकतेकडे संक्रमण
1) भारतीय ज्ञान प्रणालीची संकल्पना आणि व्याप्ती, वसाहतपूर्व काळातील ज्ञान परंपरा
2) वसाहतकालीन आधुनिकतेशी झालेला सामना, शिक्षण प्रणाली (गुरुकुल, मदरसे, पाठशाळा), प्राच्यवादी आणि उपयुक्ततावादी दृष्टिकोन, ज्ञानाची श्रेणीरचना आणि संस्थांचे परिवर्तन
3) स्वदेशी ज्ञानावर वसाहतवादी प्रभाव (सुमारे 1757-1947)

प्रकरण 2.........................................................35
वसाहतकालीन भारतातील शिक्षण, भाषा आणि ज्ञानविषयक धोरण
1) मॅकॉलेचा अहवाल, इंग्रजी शिक्षण आणि अभ्यासक्रमातील सुधारणा, स्वदेशी (स्थानिक) शिक्षण आणि विद्वत्तापूर्ण परंपरांचा ऱ्हास
2) पर्यावरणीय पैलू, कारागीर आणि हस्तकलेशी संबंधित ज्ञानातील व्यत्यय, वन कायदे, कृषी धोरणे आणि पशुपालक ज्ञान प्रणाली
3) ज्ञानाचे संकलन व आत्मसातकरण, राष्ट्रवादी प्रतिसाद आणि ज्ञान पुनरुज्जीवन; सुधारणा, विज्ञान आणि स्वदेशी परंपरा

प्रकरण 3...........................................................51
भारतातील प्राचीन आणि मध्ययुगीन वैद्यकशास्त्र
1) वैद्यकीय इतिहासाचा अर्थ आणि व्याप्ती, वैद्यकीय इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र (आयुर्वेद, धन्वंतरी, चरक, सुश्रुत आणि नागार्जुन)
2) मध्ययुगीन भारतीय वैद्यकशास्त्र (युनानी प्रणाली, हकीम)
3) पारंपरिक वैद्यकीय पद्धती (वनौषधी आणि घरगुती उपाय)

प्रकरण 4...........................................................79
भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्र
1) ब्रिटिश काळातील वैद्यकशास्त्र (रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण)
2) स्वातंत्र्यानंतरचा वैद्यकीय विकास (सार्वजनिक आरोग्य आणि सरकारी रुग्णालये)
3) भारतातील सध्याची वैद्यकीय प्रणाली (ॲलोपॅथी आणि आयुष)

प्रकरण 5.........................................................101
महाराष्ट्राची पारंपरिक शिल्पकला (प्राचीन आणि मध्ययुगीन काळ)
1) एक कला प्रकार म्हणून शिल्पकला (शिल्पकलेचा अर्थ आणि उपयोग)
2) महाराष्ट्रातील शैलशिल्प आणि सुरुवातीच्या काळातील मंदिर शिल्पकला (गुहा शिल्पकला आणि मंदिर शिल्पकला)
3) मध्ययुगातील प्रादेशिक मंदिर परंपरा (यादव आणि मराठा काळ)
प्रकरण 6.........................................................128
महाराष्ट्राची लोक आणि आधुनिक शिल्पकला
(लोक आणि आधुनिक काळ)
1) लोकशिल्पकला पद्धती (ग्रामदेवता आणि लोककला प्रकार)
2) महाराष्ट्रात आधुनिक शिल्पकलेचा उदय वसाहतवाद आणि कला संस्थांचा प्रभाव - आधुनिक शिल्पकलेतील नवीन साहित्य, विषय व शैली
3) प्रख्यात शिल्पकार आणि त्यांचे योगदान - त्यांच्या कलाकृतींचे विषय, शैली आणि महत्त्व

💬

Chat with us