Welcome to Prashant Publications

Rs. 140.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय बँकिंग प्रणाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यूजीसी प्रणित (NEP2020) नव्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.कॉम भाग- II सत्र-III...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय बँकिंग प्रणाली (Indian Banking System)
- +

भारतीय बँकिंग प्रणाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यूजीसी प्रणित (NEP2020) नव्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.कॉम भाग- II सत्र-III अभ्यासक्रमानुसार लिहिलेले आहे. मराठी भाषेमध्ये या वर्गासाठी बँकिंग प्रणालीवर चांगले पुस्तक उपलब्ध करून द्यावे हे आमच्या मनात होते. या पुस्तकाच्या रूपाने तो योग आला याकरिता प्रशांत पब्लिकेशनचे आम्ही ऋणी आहोत. पुस्तकातील क्लिष्टता टाळून विषयाची मांडणी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध विषयावर सखोल, परिपूर्ण व विविध बँकिंग वरील मतांसहित चर्चा केली आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. हे पुस्तक बँकिंग विषयाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असले तरी त्यामध्ये काही त्रुटी अथवा अपुरेपणा असू शकतो. विद्यार्थी व प्राध्यापक तज्ञांनी, मित्रांनी त्या निदर्शनाला आणून सूचना केल्यास त्या स्वागतार्ह असतील.            

प्रकरण 1.............................................................7
भारतीय बँकिंग प्रणालीचा परिचय
1.1 भारतातील बँकिंगचा विकास आणि इतिहास
1.1.1 प्राचीन व मध्ययुगीन भारतातील बँकिंग पद्धती
1.1.2 ब्रिटिश काळातील बँकिंगचा विकास
1.1.3 बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969 - 1980)
1.1.4 उदारीकरणोत्तर सुधारणा (1991 नंतर)
1.2 भारतीय बँकिंग व्यवस्थेची रचना आणि कार्यपद्धती
1.2.1 भारतातील केंद्रीय/सर्वोच्च बँका
1.2.2 व्यावसायिक बँका
1.2.3 खाजगी क्षेत्रातील बँका
1.2.4 परकीय बँका
1.2.5 सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका
1.2.6 विकास वित्त संस्था
1.3 सेवा-आधारित बँकांचे वर्गीकरण
1.4 अनुसूचित व गैर अनुसूचित बँका
1.5 आर्थिक विकासात बँकांची भूमिका आणि महत्त्व

प्रकरण 2............................................................67
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
2.1 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना
2.1.1 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मूल्यमापन
2.2 भारतीय रिझर्व्ह बँकेचे संघटन व केंद्रीय संचालक मंडळ
2.2.1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (ठइख) ची संघटनात्मक रचना
2.2.2 आरबीआयचे केंद्रीय संचालक मंडळ
2.2.3 आरबीआयचे स्थानिक मंडळ
2.2.4 आरबीआयची विभागीय कार्यालये
2.2.5 आरबीआयची प्रादेशिक कार्यालये
2.2.6 आरबीआयची पाच प्रशिक्षण संस्था
2.3 भारतीय रिझर्व्ह बँकेची उद्दिष्टे
2.4 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये :
2.5 भारतीय रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण :
2.5.1 चलनविषयक धोरणांची उद्दिष्टे
2.5.2 चलनविषयक धोरणाची साधने
2.5.3 चलनविषयक धोरणाचे महत्त्व
2.5.4 भारतातील चलनविषयक धोरणाच्या मर्यादा
2.5.5 चलनविषयक धोरण समिती
2.6 केसस्टडी
2.6.1 केस स्टडीजचे प्रकार
2.6.2 उपयोगिता चाचणीमध्ये केस स्टडीजचे फायदे
2.6.3 उपयोगिता चाचणीमध्ये केस स्टडीजचे तोटे
2.6.4 केस स्टडीच्या पायऱ्या
2.7 भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणाच्या स्थितीचे परीक्षण
2.8 कोविड नंतरच्या आर्थिक पुनर्प्राप्ती आणि वित्तीय स्थितीकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका

संदर्भ सूची..........................................................101

💬

Chat with us