Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘भारतीय राज्यव्यवस्था’ ह्या पुस्तकाचे लेखन करताना भारतीय राजकीय व्यवस्थेची सर्वांगीण स्वरूपाची माहिती अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावी हा प्रमुख उद्देश आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आंतरविद्याशाखीय...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय राज्यव्यवस्था (Indian Polity)
- +

‘भारतीय राज्यव्यवस्था’ ह्या पुस्तकाचे लेखन करताना भारतीय राजकीय व्यवस्थेची सर्वांगीण स्वरूपाची माहिती अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावी हा प्रमुख उद्देश आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आंतरविद्याशाखीय अध्ययन व्हावे म्हणून विविध ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांनी इतर ज्ञानशाखेतील विषय निवडण्याची संधी देण्याच्या उद्देशाने Open Elective (OE) हा विषय सुरू करण्यात आलेला आहे. प्रथम वर्ष कला/वाणिज्य/विज्ञान या वर्गांच्या राज्यशास्त्र विषयाच्या Open Elective (OE) अंतर्गत भारतीय राज्यव्यवस्था हा विषय शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू करण्यात आलेला आहे. या विषयाचे संदर्भ पुस्तक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केलेले आहे. भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्थेशी निगडीत अनेक घटक पदवी, पदवीत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नेट/ सेट परीक्षेतील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत. म्हणून उपरोक्त पुस्तकांची रचना विद्यापीठीय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षा या दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल या हेतूने केलेली आहे. या पुस्तकाची रचना एकूण सहा प्रकरणात केलेली आहे. पहिल्या प्रकरणात केंद्रीय कार्यकारी मंडळ विषयक माहिती समाविष्ट आहेत तर प्रकरण दुसऱ्या प्रकरणात केंद्रीय कायदेमंडळ मंडळ विषयक विषयी माहिती दिलेली आहे. तिसऱ्या प्रकरणात राज्य कार्यकारी मंडळ आणि चौाथ्या प्रकरणात राज्य कायदे मंडळ बाबत माहिती समाविष्ट केलेली आहेत. पाचव्या प्रकरणात भारतीय न्यायव्यवस्था आणि सहाव्या प्रकरणात निवडणूक प्रक्रिया विषयक माहितीचा समावेश केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकांच्या माध्यमातून भारतीय राज्यव्यवस्थेशी निगडीत संकल्पना समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना संबंधित विषयाशी निगडीत इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.          

शासनाची अंगे (केंद्र आणि राज्य)

(1) केंद्रीय कार्यकारी मंडळ...........................................7
1. राष्ट्रपती- रचना, निवडणूक स्वरूप, अधिकार, कार्य व भूमिका
2. पंतप्रधान- नेमणूक, अधिकार व कार्य
3. केंद्रीय मंत्रिमंडळ- रचना, अधिकार व कार्य

(2) केंद्रीय कायदेमंडळ..............................................44
1. राज्यसभा- रचना, अधिकार/कार्य, सभापती, आवश्यकता व मूल्यमापन
2. लोकसभा- रचना, अधिकार कार्य, सभापती, महत्त्व
3. भारतातील कायदानिर्मितीची प्रक्रिया
4. संसदीय समित्या
5. संसदीय आयुधे

(3) राज्य कार्यकारी मंडळ...........................................98
1. राज्यपाल- रचना, अधिकार व कार्य
2. मुख्यमंत्री- नेमणूक, अधिकार व कार्य
3. राज्य मंत्रिमंडळ- रचना, अधिकार व कार्य

(4) घटकराज्य विधिमंडळ.........................................118
1. विधानपरिषद- रचना, अधिकार/कार्य, सभापती, आवश्यकता, मूल्यमापन
2. विधानसभा- रचना, अधिकार व कार्य आणि सभापती
3. भारतातील कायदानिर्मितीची प्रक्रिया

(5) भारतीय न्यायव्यवस्था.........................................139
1. ऐतिहासिक पोर्शभूमी
2. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय रचना आणि कार्य
3. न्यायालये, कौटुंबिक न्यायालये आणि लोकअदालत

(6) निवडणूक प्रक्रिया.............................................168
1. ऐतिहासिक पोर्शभूमी
2. भारतीय निवडणूक आयोग
3. मतदान यंत्र (एतच / ततझअढ)

संदर्भ ग्रंथसूची.....................................................187

💬

Chat with us