Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
कोणत्याही देशाच्या संविधानाच्या स्वरुपावर त्या देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक तथा आर्थिक या सारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो. देशाअंतर्गत या घटकाप्रमाणेच अन्य देशातील काही घडामोडी, विचारप्रणाली, अस्तित्त्वात असलेली संविधाने इत्यादी घटकांचाही प्रभाव पडतो. भारताचे संविधान घटना समितीद्वारा निश्चित काळात तयार केले गेले. भारतीय संविधानाचे स्वरुप 395 कलमे, 22 प्रकरणे व 08 परिशिष्ट्ये मिळून लिखित स्वरुपात तयार करण्यात आले. भारतीय संविधानाचा विचार करता संविधान दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या 3 पद्धतीचा उल्लेख केला आहे. संविधानकर्त्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी राज्याचे धोरण अत्यंत महत्त्वाचे असते. राज्यकारभाराच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य असते. भारतीय राजकीय व्यवस्थेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकसभा व राज्यसभा यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, उद्देशपत्रिका, राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे, घटनात्मक पदे व त्यांची विविध कार्ये, लोकसभा, राज्यसभा, संसद सदस्य, न्यायालय, निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, कायदा निर्मितीची प्रक्रिया, पंचायतराज, केंद्र शासनाशी संबंधित समित्या, मूल्यमापन समित्या, ग्रामसभा व महिलांचा सहभाग, संयुक्त महाराष्ट्र व नागपूर करार, माहितीचा अधिकार इ. बाबींचे अभ्यासपूर्ण व तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे.