Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला (TYBA) या वर्गाच्या Major Elective (Theory) अंतर्गत या विषयाच्या जून 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) या...

  • Name : भौगोलिक माहिती प्रणालीची (जी.आय.एस.) मूलतत्त्वे Fundamentals of GIS
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Arts
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 134 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भौगोलिक माहिती प्रणालीची (जी.आय.एस.) मूलतत्त्वे Fundamentals of GIS
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला (TYBA) या वर्गाच्या Major Elective (Theory) अंतर्गत या विषयाच्या जून 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) या पॅटर्णनुसार अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले “भौगोलिक माहिती प्रणालीची (जी.आय.एस.) मूलतत्त्वे” हे संदर्भ पुस्तक आमचे विद्यार्थी व प्राध्यापक बंधू भगिनी यांच्या हाती देताना आम्हास विशेष आनंद होत आहे.
भूगोल हा विषय तसा गतिमान असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भूगोल अभ्यास मंडळ यांनी याविषयाचा समाजाभिमुख अभ्यासक्रम तयार करताना भूगोलाच्या माध्यमातून अनेक चालू घडामोडींचा परामर्श घेतला आहे. काळानुरूप बी. ए. पदवी पर्यंतचा लागू केलेला अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाचा एक आगळा वेगळा प्रयत्न असल्याने आजपर्यंत मराठीतून कमी पुस्तके जी आय एस ची मूलतत्वे या विषयावर मराठी मध्ये उपलब्ध आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही हे संदर्भ कम पाठ्यपुस्तक परिश्रम पूर्वक प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेट वरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. या सर्व साधनांचा वापर करून अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमच्या या परिश्रम पूर्वक प्रयत्नाचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. 
भूगोल विषयाची बांधिलकी, तज्ञ अभ्यासकांशी चर्चा, अहवाल, चर्चासत्र, आमचा थोडासा अनुभव आणि काही मूळ संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सदरचे पुस्तक सध्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट/सेट परीक्षांना ही उपयोगी ठरेल असा प्रयत्न केला आहे.

प्रकरण 1........................................................................7
भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय
(Introduction to Geographic Information System)
1.1 भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System - GIS) : अर्थ व व्याख्या
1.2 भौगोलिक माहिती प्रणालीचा इतिहास (History of GIS)
1. प्रारंभिक कालखंड (1854 पूर्व ते 1950)
2. आधुनिक GIS ची सुरुवात (1960 चे दशक)
3. विकासाचा कालखंड (1970 चे दशक)
4. व्यावसायिक विस्तार (1980 चे दशक)
5. GIS विज्ञानाचा उदय (1990 चे दशक)
6. आधुनिक GIS (2000 नंतर)
1.3 भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक (Components of GIS)
1 हार्डवेअर (Hardware)
2 सॉफ्टवेअर (Software)
3 डेटा (Data)
4 लोक (People)
5 पद्धती (Methods)

प्रकरण 2.......................................................................32
भौगोलिक माहिती प्रणाली डेटा प्रतीमाने
(Geographical Information System Data Models)
2.1. भौगोलिक माहिती प्रणाली डेटा प्रतीमाने (GIS Data Model) व्याख्या
भौगोलिक माहिती प्रणाली डेटा प्रतीमानेचे प्रकार
1. स्थानिक डेटा / भौगोलिक प्रतीमाने (Spatial Data)
2. अस्थानिक डेटा किंवा गुणधर्म प्रतीमाने (Non-Spatial Data)
2.2 स्थानिक / भौगोलिक डेटा Spatial Data मिळविण्याचे प्रमुख स्रोत
1. स्थलनिर्देशक नकाशे (Toposheets)
2. सर्वेक्षण (Surveying)
3. हवाई छायाचित्रे (Aerial Photographs)
4. उपग्रह माहिती व प्रतिमा (Satellite Data and Images)
2.3 स्थानिक (Spatial) डेटाचे प्रकार (Types of Spatial Data)
अ) व्हेक्टर डेटा (Vector Data)
ब) रास्टर डेटा (Raster Data)
2.4 व्हेक्टर डेटा मॉडेलची रचना (Structure of Vector Data Model)
1. बिंदू (Point)
2. रेषा (Line)
3. बहुभुज (Polygon)
2.5 रास्टर डेटाची वैशिष्ट्ये (Characteristics of Raster Data)

प्रकरण 3.......................................................................70
भौगोलिक माहिती प्रणाली मधील डेटा संपादन
(GIS Data Editing)
3.1 डेटा संपादन (GIS Data Editing) : प्रस्तावना, व्याख्या, अर्थ
भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) मधील डेटा किंवा महिती संपादन/ डेटा किंवा महिती इनपुटच्या पद्धती (Methods of Data Input)
स्कॅनिंग (Scanning)
डिजिटायझेशन (Digitization)
GPS (Global Positioning System)
3.2 भू-संदर्भीकरण (Georeferencing)
3.3 GIS मधील टोपोलॉजी निर्मिती (Topology Building)
टोपोलॉजिकल त्रुटी (Topological Errors)
स्थानिक त्रुटी (Locational Errors)
किनार जुळवणी (Edge Matching)
3.4 गुणधर्म डेटा/माहिती जोडणी (Attribute Data Linking)

प्रकरण 4.....................................................................104
भौगोलिक माहिती प्रणालीतील विश्लेषणात्मक प्रक्रिया व
विविध क्षेत्रांतील उपयोग
(GIS Analysis and Applications)
4.1 मूलभूत भौगोलिक माहिती प्रणालीची कार्यप्रणाली - ओव्हरले विश्लेषण, बफर विश्लेषण,
4.2 स्थलाकृतिक विश्लेषण : DEM आणि DTM
4.3 भौगोलिक माहिती प्रणालीचे (GIS) अनुप्रयोग/उपयोग

💬

Chat with us