Welcome to Prashant Publications

Rs. 220.00 10% OFF
Availability: 10 left in stock


मनोगत
भारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी (Multidisciplinary) दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यार्थ्यांना सर्व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मुलभूत बँकिंग (FUNDAMENTALS OF BANKING)
- +


मनोगत
भारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी (Multidisciplinary) दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे किमान व्यावहारिक ज्ञान देऊन एक संपन्न मानवी संसाधन निर्माण करणे आहे. भारत सरकारच्या मानवी संसाधन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीने निर्देश केल्या प्रमाणे भारतातील सर्व विद्यापीठांनी 2020 च्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करुन सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना 2024 पासून केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे भारतातील एक आघाडीचे आणि अग्रणीचे विद्यापीठ ठरत आहे. यात एक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण बदल करणे, त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवोन्मेष प्रतिबिंबित करणे आणि कार्यक्षम मानवी संसाधन व जबाबदार नागरिकांची निर्मिती करणे हा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विद्यापीठाने 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून जून/जुलै 2024 पासून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन त्यांची कार्यवाही केली. विद्यापीठात मानव्य विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अशा तीन प्रमुख विद्या शाखा आहेत. यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी काही विषय Multidisciplinary म्हणून स्वीकारणे निश्चित झाले. त्यानुसार मानव्यविद्या शाखेच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने Fundamentals of Banking हा विषय एक पर्यायी विषय म्हणून प्रथम वर्षाच्या सत्र 1 आणि सत्र 2 साठी सादर केला आहे.
अभ्यासक्रम तयार करताना अभ्यास मंडळाने विचारपूर्वक मांडणी केली आहे. Fundamentals of Banking हा असा विषय आहे. ज्यात सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रस निर्माण, होईल. खरे तर भारताला जर 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर देशातील सर्व नागरिकांमध्ये बँकिंग विषयाचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जाण निर्माण करण्यात निश्चितच यशस्वी ठरणार.
Fundamentals of Banking चा अभ्यासक्रम दोन सत्रात विभागला आहे. पहिल्या सत्रासाठी दोन युनिट्स आणि दुसऱ्या सत्रासाठी चार युनिट्सचा तयार केलेला आहे. पहिल्या सत्राच्या पहिल्या युनिट्समध्ये बँकिंंगचा अर्थ, उत्क्रांती 4 | प्रशांत पब्लिकेशन्स 
आणि संरचना घटकांचा समावेश आहे, तर दुसऱ्या घटकात बँकांची कार्ये समाविष्ट आहेत. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या घटकात खाते उघडणे व त्यावर व्यवहार करणे, दुसऱ्या घटकात बँकींगची तत्त्वे आणि बँकिंग व्यवसायात वापरली जाणारी बँक उत्पादने/साधानांना समावेश आहे. तिसऱ्या घटकात चेक, व्यापारी हुंड्या वचनचिठ्ठ्या या चलनक्षम दस्तऐवज आणि त्याच्या पृष्ठांकनांचा समावेश आहे. चौथ्या घटकात बँक व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
सदर क्रमिक पुस्तकात दोन्ही सत्राच्या सर्व घटकातील प्रमुख व उपमुद्यांची सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडणी केली आहे. ज्ञान देतांना कोणत्याही शॉर्टकटचा वापर केलेला नाही. संपूर्ण पुस्तक माझ्या पातळीवर परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्र आणि सर्व अध्ययनकर्त्यांच्या प्राथमिक बँकिंग ज्ञानाची गरज यातून निश्चितच भागेल. याची मला खात्री आहे. पण तरीही काही उणिवा असू शकतात. कृपया त्या कळवाव्यात त्याचा मी स्वीकार करुन पुढील वेळेस उणीव दूर करण्याचा प्रयत्न करेल.


अनुक्रमणिका
1. बँकांची उत्क्रांती आणि विकास..................................7
(Evolution and Developments of Banking)
1.1 बँक अर्थ अणि व्याख्या
(Banks : Meaning and Definition)
1.2 बँकांची उत्क्रांती
(Evolution of Banking)
1.3 भारतीय बँकिंग प्रणालीची संरचना
(Structure of Indian Banking System)
2. बँकांची कार्ये ...................................................26
(Functions of Banking)
2.1 प्राथमिक कार्ये
(Primary Functions)
2.2 दुय्यम किंवा गौण कार्ये
(Secondary Functions)
3. बँक खाते उघडण्याची प्रक्रिया आणि बँक खात्यावरील व्यवहार.....38
(Procedure for Opening and Operating of Deposit Account)
3.1 बँक खात्याचे प्रकार
(Types of Bank Account)
3.2 बँकेत खाते उघडण्याची पद्धती
(Procedure for Opening Deposite Account)
3.3 के.वाय.सी. तुमच्या ग्राहकाची ओळख
(Know Your Customer - KYC)
3.4 बँक खात्यावरील व्यवहार करण्याच्या पद्धती/प्रक्रिया
(Procedure for Operating Deposite Account)
3.5 खाते हस्तांतरण आणि मृत्यु दावा प्रक्रिया
(Transfer of Account and Dealth Claim Procedure)
3.6 बँक खाते बंद करण्याची प्रक्रिया
(Procedure of Closure of Account)
3.7 बँक ग्राहक/खातेदारांचे प्रकार
(Types of Customer)6 | प्रशांत पब्लिकेशन्स
4. बँकिंग व्यवसायाची तत्त्वे आणि पैसे पाठविण्याचा पध्दती.......72
(Principles of Banking Business and Methods of Remittance)
4.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता
(Meaning and Essentials of Sound Banking)
4.2 बँकीगची तत्वे
(Principles of Banking)
4.3 पैसे हस्तांतरणाच्या पध्दती
(Methods of Remittance)
4.4 बँक ग्राहकाचे पतमापन
(Customer Credit Assessment)
5. चलनक्षम दस्तऐवज आणि पृष्ठांकन.............................96
(Negotiable Instruments and Endorsement)
5.1 चलनक्षम दस्तऐवज : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये ............ (Negotiable Instruments : Definition, Meaning and Characteristics)
5.2 चलनक्षम दस्तऐवजाचे प्रकार
(Types of Negotiable Instruments)
5.3 पृष्ठांकन
(Endorsment)
6. बँकींगमधील आधुनिक तंत्रज्ञान...............................121
(Modern Technology in Banking)
6.1 बँक सेवांमधील तंत्रज्ञान
(Technology in Banking Services)
6.2 मोबाईल बँकिंग
(Mobile Banking)
6.3 नेट बँकिंग
(Net Banking)
6.4 बँकिंग तंत्रज्ञान वापरात घ्यावयाची काळजी
(Precautions in using Technology in Banking)

💬

Chat with us